South Goa Loksabha Candidate Dainik Gomantak
गोवा

South Goa Loksabha: काँग्रेस, भाजपसाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ एवढा महत्वाचा का आहे?

South Goa Loksabha Candidate: भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोन्ही पक्षासाठी दक्षिण गोवा मतदारसंघ महत्वाचा आहे.

Pramod Yadav

South Goa Loksabha Candidate

भारतीय जनता पक्षाचा दक्षिण गोव्यातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप यावेळी महिला उमेदवाराचा पर्याय देऊ शकतो असे जवळपास निश्चित झाले असून, अधिकृत घोषणा बाकी आहे.

मागील 25 वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तरेत विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना विक्रमी सहाव्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे.

दुसरीकडे राज्यातील दोन्ही जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. दोन्ही पक्षासाठी महत्वाच्या असणाऱ्या दक्षिण मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यासाठी वेळ घेत आहेत.

उत्तर गोवा १९९९ पासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. श्रीपाद नाईक यांनी पाचवेळा मतदार संघावर आधिपत्य गाजवलं आहे. आणि सहाव्यांदा पक्षाने श्रीपाद नाईक यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी जाहीर केली आहे.

२०१४ साली भाजपने काँग्रेसच्या उमेदावाराचा पराभव करून दक्षिणेत देखील भाजपचा झेंडा फडकवला. पण, २०१९ साली भाजपला फटका बसला. मोठ्या प्रमाणावर कॅथलिक समाजातील मतदार असलेल्या दक्षिणेत भाजपने यावेळी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी देखील भाजप अधिक वेळ घेत आहे. भाजपने चार याद्या जाहीर केल्या मात्र, अद्याप दक्षिणेतील उमेदवाराची घोषणा केली नाही.

वीस आमदारांचे पाठबळ

दक्षिण गोव्यात २० विधानसभा मतदारसंघ असून, यातील दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत, तर दोन आपचे आमदार आहेत. तर, गोवा फॉरवर्डचा एक आमदार आहे. सर्व इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत.

गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या मतदारसंघात दहावेळा काँग्रेसचे खासदार होते. तर, १९९९ आणि २०१४ असे दोनवेळा भाजपने या जागेवर विजय मिळवला होता.

१९६२ साली महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष, १९६७ आणि १९७१ साली युनाटेड गोवन्स तर १९९६ साली युनाडेट गोवन्स डेमोक्रॅटीक पक्षाने या मतदारसंघात विजय मिळवला होता.

कधीकाळी काँग्रेससोबत असणारा महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष सध्या भाजपसोबत असून, दक्षिणेत त्यांचा एकच आमदार आहे. भाजप दक्षिणेची जागा मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करताना दिसत आहे तर, काँग्रेस पुन्हा विजयचा दावा करत आहे.

उमेदवार घोषणेला विलंब

भाजपच्या चार याद्या प्रसिद्ध झाल्या मात्र अद्याप दक्षिण गोव्यातील उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. दक्षिणेत भाजप महिला उमेदवाराचा पर्याय निवडू शकतो हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

सुरुवातीला समोर आलेल्या नावांमध्ये हिदुत्ववादी कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांचे नाव आघाडीवर होते. पण, सध्या पल्लवी श्रीनिवास धेंपे यांचे नाव समोर आले आहे. पल्लवी यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, अधिकृत घोषणा बाकी आहे.

दुसरीकडे काँग्रेस उमेदवारीची घोषणा भाजपच्या उमेदवारावर अवलंबून असल्याची एक चर्चा समोर येत आहे. मात्र, काँग्रेस उमेदवारीस करत असलेल्या विलंबबाबत घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उमेदवार कोण याची उत्सुकता

दक्षिण गोव्यात भाजप असो किंवा काँग्रेस दोन्ही पक्षाचा उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उमेदवाराच्या विनिंग मेरीटचा यावेळी विचार केला जाणार आहे.

२०१४ साली उमेदवार बदलल्याने काँग्रेसला फटका बसला होता. तर, विद्यमान खासदार सार्दिन यांच्या उमेदवारीला विजय सरदेसाई यांचा विरोध होताना दिसत आहे. शिवाय दक्षिणेत काँग्रेस इच्छुक उमेदवारांचा विचार केला जाणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे भाजपला २०१९ मध्ये पराभवाचा सामाना करावा लागला होता. त्यामुळे भाजप उमेदवार घोषणेसाठी सावध भूमिका घेताना दिसत आहे.

रिव्हॉल्युशनरी गोवन्सची एन्ट्री

राज्यात एकच आमदार असलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्स यावेळी लोकसभेत नशीब आजमावत आहे. राज्यात सर्वात पहिल्यांदा आरजीने उमेदवारांची घोषणा केली. उत्तरेत मनोज परब आणि दक्षिणेत रुबर्ट परेरा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलीय.

सुरुवातीला इंडिया आघाडीसोबत जाईल अशी शक्यता निर्माण झालेल्या आरजीने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, निवडून आलेला खासदार आघाडीला पाठिंबा देणार असल्याची घोषणा परब यांनी केली. दरम्यान, आरजी होणाऱ्या मतदानाचा काँग्रेस की भाजपला फटका बसणार हे देखील निर्णायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT