Goa Tourism: गोव्याच्या पर्यटन व्यवसायात परदेशी पर्यटकांचा मोठा वाटा आहे. यात प्रामुख्याने खर्चाळू रशियन आणि ब्रिटीश प्रर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात रशियन आणि श्रीमंत भारतीय गोवा ऐवजी दुबईला जाणे पसंद करतायेत.
राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी यामागील नेमके कारण जाणून घेण्याची गरज असल्याचे उद्गार यापूर्वी काढले होते.
दुबईला पर्यटक अधिक पसंती का देत आहेत याचे कारण दुबई डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमी अँड टुरिझम (DET) मधील दक्षिण आशियाचे क्षेत्र प्रमुख बदर अली हबीब यांनी दिले आहे. बदर अली हबीब एका खासगी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधत होते.
रशियन आणि भारतीय दुबईकडे अधिकाधिक आकर्षित होण्याची विविध कारणे आहेत असे हबीब म्हणाले. यामध्ये गतिमान आंतरराष्ट्रीय घडामोडी, रशियन लोकांचा प्राधान्यक्रम आणि प्रवासाच्या सवयी यांचा समावेश आहे. या सर्वच गोष्टी पर्यटक दुबईकडे आकर्षित होण्यासाठी कारणीभूत आहेत, असे हबीब म्हणाले.
कोरोना काळात 2019 पासून ते 2023 च्या पहिल्या सात महिन्यांपर्यंत दुबईला जाणार्या रशियन प्रवाशांमध्ये 80 टक्के लक्षणीय वाढ झाल्याचा खुलासा हबीब यांनी केला. दुबईच्या पर्यटन उद्योगासाठी रशिया प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कोरोना काळापासून, दुबईमध्ये येणाऱ्या रशियन पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, पर्यटकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. ज्यात व्हिसा-ऑन-अरायव्हल आणि थेट फ्लाइट अशा गोष्टींचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.