GPCC President Amit Patkar, General Secretary Capt Viriato Fernandes Press conference
GPCC President Amit Patkar, General Secretary Capt Viriato Fernandes Press conference Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसला घाबरल्याने उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे वापरा आणि फेका धोरण - पाटकर

Pramod Yadav

Goa Congress

भाजपच्या दोन ज्येष्ठ आमदारांनी दक्षिण गोवा लोकसभेची जागा लढविण्यास नकार दिला. 'जुमला' पक्षाला पराभवाचा सामना करावा लागेल असा हा निकाल असल्याचे वक्तव्य गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी शनिवारी (दि.09) केले.

काँग्रेस हाऊस-पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अमित पाटकर बोलत होते.

भाजप दक्षिणेतील जागा पुन्हा गमावेल हे माहित असल्याने सभापती रमेश तवडकर आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, यांनी दक्षिण गोव्याची जागा लढवण्यास नकार दिला आहे, असे पाटकर म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसकडे उमेदवार असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्याची घोषणा केली जाईल, असेही पाटकरांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षापासून भाजप 2024 मध्ये दक्षिण गोव्याची जागा जिंकेल असा दावा करत आहे, पण अद्याप त्यांना उमेदवार सापडला नाही, असे पाटकर म्हणाले.

भाजप एवढा गोंधळलेला आहे की काँग्रेसला घाबरून उमेदवार जाहीर करण्यासाठी विलंबाचे डावपेच वापरत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

काँग्रेसच्या विद्यमान खासदाराने दक्षिण गोव्यात खूप काम केले आहे आणि लोकांचा आमच्या पक्षावर विश्वास आहे. भाजप कशाप्रकारे फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे, हे जनतेला माहीत आहे. भाजपने ‘डिफेक्टर्स’चा वापर करून त्यांची राजकीय कारकीर्द कशी संपवली याची उदाहरणे आहेत, असे पाटकर म्हणाले.

भाजपचे ‘वापरा आणि फेका’ हे धोरणही पक्षबदलू राजकारण्यांनी बघितले आहे असेही ते पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT