Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'म्हादई'बाबत केंद्राचा निर्णय नेमका कुणाच्या बाजुने? सावंत यांच्यासह बोम्मई यांनीही मानले मोदींचे आभार

प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचा कर्नाटकचा दावा; तर मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आमची मागणी मान्य

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: म्हादई पाणी प्रश्नावर आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय झाला.

या निर्णयाची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विट करून दिली. त्यानुसार 'म्हादई प्रवाह' या नावाने म्हादई पाणी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, केंद्राच्या या निर्णयाचे गोव्याच्या तसेच कर्नाटकच्याही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले असून आपल्या बाजूने निर्णय झाल्याचे सांगत दोन्ही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

त्यामुळे केंद्राचा हा निर्णय नेमका कुणाच्या बाजुने आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, म्हादई पाणी वाटपाचा प्रश्न अद्यापही सर्वोच्च न्यायालयासह जलविवाद लवादाकडे प्रलंबित आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणे, या आमच्या प्रमुख मागणीला केंद्राने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.

यामुळे कर्नाटकाकडून अवैधरित्या पाणी वळविण्याच्या निर्णयाला चाप बसणार असून गोव्याला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा जलविवाद लवादाच्या निवाड्याची अंमलबजावणी करणारा आहे.

कर्नाटक सरकारने सादर केलेला आणि जलशक्ती आयोगाने मंजुरी दिलेल्या म्हादई, कळसा भांडुरा प्रकल्पाच्या पूर्णत्त्वास नेणार आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार.

गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज म्हादई प्रवाहच्या निर्मितीला मंजुरी दिली. यामुळे म्हादई पाणी विवाद न्यायाधिकरणाच्या निवाड्याचे आणि निर्णयांचे पालन, अंमलबजावणी करणे शक्य होईल.

तसेच गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत परस्पर विश्‍वास आणि समजूतदारपणा निर्माण करण्यास देखील मदत होईल. केंद्राच्या निर्णयामुळे तिन्ही राज्यांतील सर्वांगीण विकासासाठी जलस्रोतांचा योग्य वापर होईल.

त्यावर गोव्यासह, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT