Danielle McLaughlin  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 6 वर्षांपुर्वी झाला बलात्कार आणि खून; Danielle McLaughlin ला न्याय कधी मिळणार?

ब्रिटन, आयर्लंडच्या अधिकाऱ्यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट

Akshay Nirmale

British Irish envoys meets Goa CM Pramod Sawant : ब्रिटिश आणि आयरिश डिप्लोमॅट्सनी गुरूवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. काणकोण येथे 2017 मध्ये ब्रिटीश-आयरिश महिला डॅनिएल मॅक्लॉफिन हिचा बलात्कार करून खून केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणात न्यायालयाने त्वरीत निर्णय द्यावा, अशी विनंती या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

ब्रिटीश उपउच्चायुक्त अॅलन गेमेल आणि कॉन्सुल जनरल ऑफ आयर्लंड अनिता केली यांनी मुख्यमंत्री सावंत आणि गोवा सरकारमधील उच्चाधिकाऱ्यांची भेट घेतली.

जेमेल आणि केली म्हणाले की, मॅक्लॉफ्लिनला गोव्यात खून होऊन सहा वर्षे झाली आहेत. या खटल्यात न्यायालयाचा निकाल येणे हे ब्रिटिश आणि आयरिश सरकार तसेच मॅक्लॉफ्लिनच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे.

आम्ही हे प्रकरण संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून मांडले आहे. खटल्याच्या गतीबद्दल आणि डॅनियलच्या कुटुंबावर त्याचा होत असलेला परिणामाबद्दल आम्हाला चिंता वाटते. म्हणून आम्ही एकत्रितपणे गोव्यात आलो आहोत.

मुख्यमंत्री सावंत यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून योग्य कार्यवाही करू, असे सांगितले आहे.

मॅक्लॉफलिनची आई आंद्रिया ब्रॅनिगन म्हणाल्या की, "डॅनियलला न्याय मिळावा यासाठी मी माझ्या परिने जे करायचे आहे ते केले आहे. डॅनिएलचे प्रकरण सर्वोच्च स्तरावर मांडल्याबद्दल मी ब्रिटीश उच्चायुक्तांचे आणि भारतातील आयर्लंडच्या दूतावासाचे आभार मानते."

मार्च 2017 मध्ये काणकोण येथे 28 वर्षीय डॅनियलची बलात्कार करून करण्यात आली होती. याप्रकरणी गोवा पोलिसांनी विकट भगत याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.

या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी जेमेल आणि केली यांनी यापूर्वीही 9 जून 2022 रोजी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT