प्रतिकात्मक फोटो Dainik Gomantak
गोवा

मनाला ओल देणारी अधिसूचना

विकासाच्या रेट्यापुढे पाण्याच्या जागा हतबलपणे अदृश्‍य होताना दिसताहेत

दैनिक गोमन्तक

पाणवठे औपचारिकपणे अधिसूचित होणे म्हणजे काय असतं? ते त्यांना मिळालेलं एक आश्‍वासक संरक्षण असतं. आज विकासाच्या रेट्यापुढे पाण्याच्या जागा हतबलपणे अदृश्‍य होताना दिसताहेत, नद्या आटताना आढळताहेत. अशावेळी जेव्हा गोव्यातील सहा पाणवठा क्षेत्रे सरकारी फर्मानाने संरक्षित होतात तेव्हा मनालाही थोडीशी ओल येते.

अशा संरक्षित परिसरात उद्योग किंवा घरबांधणीला सक्त मनाई असते. मात्र पारंपारिक मासेमारी, शेती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मिळे मज्जाव नसतो. वृक्षांचे रोपण त्या जागी करता येत नसले तरी तेथे नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या रोपट्यांच्या संवर्धनाला परवानगी असेल. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे हे पाणवठे पर्यवरणपुरकही आहेत. सुंदर डोळ्यांना खोल तळ्याची उपमा आपण देतोच ही तळी त्या उपमेच्या बदल्यात आपल्या डोळ्यांना अमाप सुख देऊन आपली नजर आनंदी करते हे आपण विसरु नयेच.

अधिसूचित झालेले पाणवठे...

सासष्टी तालुक्यातील कोठंबी तळे हे सुमारे 124000 चौरस मिटरचे क्षत्र व्यापून आहे. त्याच्या आसपासचे मिळुन सुमारे 64590 चौरस मिटरचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झालेले आहे.

शेल्डे तळे, या नावांने ओळखले जाणाऱ्या तळ्याला आसपासच्या 12,836 चौरस मिटर जागेबरोबरच संरक्षण लाभले आहे.

चिंबलच्या डोंगरावर असलेल्या तळ्यावरून एकेकाळी खालच्यास गावांना पाणी पुरवठा व्हायचा या तळ्याचे क्षेत्र आहे 51,085 चौरस मिटर आणि तिथले संरक्षित क्षेत्र आहे 1,79,520 चौरस मिटर

बार्देश तालुक्यातील रेवोडा गावात वसलेले दासीच्या तळ्याचे क्षेत्र आहे 6,089 चौरस मिटर आणि तेथील एकंदर संरक्षित क्षेत्र आहे 6,81,434 चौरस मिटर.

सासष्टी तालुक्यातील सारझोरा गावांचे, गावाच्या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या तळ्याच्या परिसरातले 680414 चौरस मिटरचे क्षेत्र संरक्षित झाले आहे. त्यापैकी 1,24,600 चौरस मिटर क्षेत्रात हे तळे पसरलेले आहे.

केपे पालिकेच्या क्षेत्रात येणोर ‘नंदा’ तळे 1,04,414 चौरस मिटर जागा व्यापते. त्याच्या आजूबाजूच्या मिळून एंकदर 57,410 चौरस मिटर परिसर संरक्षित बनलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT