Lusophone Festival in Goa Dainik Gomantak
गोवा

Lusophone Festival in Goa: गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव काय आहे? जाणून घ्या ऐतिहासिक संबंध

गोव्यात 3 ते 6 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

Pramod Yadav

गोव्यात 3 ते 6 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सवाचे (International Lusophone Festival in Goa) आयोजन केले जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. गोव्याचा लुसोफोन देशांशी ऐतिहासिक संबंध आहे. ओरिएंट फाऊंडेशन, कॅमोज इन्स्टिट्यूट यांसारख्या पोर्तुगीज सांस्कृतिक संस्थांच्या मार्फत गोवा या देशांचा संबध जोपासला गेला आहे. या संस्था भारतातील पोर्तुगीज भाषा आणि संस्कृतीचा प्रचार करतात.

आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव काय आहे?

लुसोफोन देशांमध्ये पोर्तुगाल, ब्राझील, अंगोला, मोझांबिक, केप वर्दे, गिनी बिसाऊ, साओ टोम आणि प्रिन्सिप यांचा समावेश होतो. गोव्यात होणाऱ्या महोत्सवात अंदाजे 70 कलाकारांचा समावेश असेल. महोत्सवात लुसोफोन संगीतावरील कार्यशाळा, छायाप्रतींचे विविध कार्यशाळा आणि प्रदर्शन, अद्वितीय गोव्याच्या वास्तुकला, गोवा हस्तकला आणि गोवन फर्निचर यांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, लुसोफोन फूड अँड स्पिरिट्स फेस्टिव्हलमध्ये भारत आणि लुसोफोन देशांमधील पाककलांचे प्रदर्शन केले जाणार आहे.

Lusophone Festival in Goa

लुसोफोन समूहाचे अंगोला, ब्राझील, काबो वर्दे, गिनी बिसाऊ, मोझांबिक, पोर्तुगाल आणि साओ टोम आणि प्रिन्सिप हे संस्थापक देश आहेत. तिमोर लेस्टे आणि इक्वेटोरियल गिनी हे देश नंतर सामील झाले. 9 लुसोफोन देशांत 4 वेगवेगळ्या खंडांतील (आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आशिया आणि युरोप) अंदाजे 300 दशलक्ष लोक राहतात. जुलै 2021 मध्ये CPLP मध्ये भारत सहयोगी निरीक्षक म्हणून सामील झाला. CPLP मध्ये सामील झाल्यानंतर 05 मे 2022 रोजी दिल्ली येथे जागतिक पोर्तुगीज भाषा दिन साजरा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT