Sonali Phogat Passed Away Dainik Gomantak
गोवा

BJP Leader: भाजप नेत्या सोनालींचा मृत्यू नेमका कशामुळे?

खळबळ : विधानसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच घटना

दैनिक गोमन्तक

पणजी: हरियाणातील प्रसिद्ध अभिनेत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट (वय 42) यांचा आज मंगळवारी राज्यातील हणजुणे येथे तारांकित रिसॉर्टसमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. प्रथमदर्शनी ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे. सोनालीचे नातेवाईक आज रात्री उशिरा हिस्सारहून गोव्यात पोहोचले असून उद्या शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, नातेवाईकांनी या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

(What exactly caused the death of BJP leader Sonali)

हणजुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट सोमवारी (ता.22) आपली मुलगी यशोधरा (15वर्षे) त्यांचे पीए सुधीर सांगवान आणि इतर दोन मित्रांसोबत पर्यटनासाठी गोव्यात आल्या होत्या. त्या हणजुणे येथील दी ग्रॅण्ड कर्लिस या हॉटेलमध्ये मुक्कामी होत्या. 24 ऑगस्टपर्यंत गोव्यात राहून त्यानंतर त्या मुंबईला जाणार होत्या. मात्र, तत्पूर्वी सोमवारी रात्री त्या एका नाईट क्लबमध्ये गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याचे इतरांना सांगितले. तशा अवस्थेत त्यांना हणजुणे येथीलच सेंट ॲन्थोनी या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हरियाणात राजकीय वातावरण तापले

हरियाणातील सर्वात चर्चित मतदारसंघ म्हणून आदमपूरची नोंद आहे. येथून काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिष्णोई यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे सोनाली आदमपूरच्या भाजप उमेदवारीच्या मुख्य दावेदार आहेत. सध्या आदमपूरची पोटनिवडणूक लागली असून येथून भाजपने अद्याप कोणालीही उमेदवारी दिलेली नाही. मात्र, सोनाली यांच्या आकस्मिक मृत्यूने हरियाणात खळबळ माजली आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरणही पेटलेले आहे.

पती निधनाचे गूढ

सोनालींचे पती संजय कुमार यांचा 2016 मध्ये हिस्सार येथील फार्म हाऊसमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. सोनालीचांही अशाच प्रकारे मृत्यू झाल्याने हरियाणात संशयाचे वादळ उठले आहे. ‘बिग बॉस 14’ या चर्चित मालिकेमध्ये त्या सहभागी झाल्यावर सोनाली यांनी आपल्या कुटुंबामधील पुरुषांच्या अचानक मृत्यूची हिस्ट्री सांगितली होती. त्यानंतर तिचा चित्रपटसृष्टी व राजकारण सोडण्याचा विचार होता. मात्र, सासूच्या इच्छेखातर त्या या क्षेत्रात कार्यरत होत्या.

सोनाली यांनी 2019 साली भाजपतर्फे आदमपूरमधून विधानसभेला काँग्रेसच्या कुलदीप बिष्णोई यांच्याविरोधात उभ्या होत्या. मात्र, त्या पराभूत झाल्या. त्यांच्या निधनाबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांनी दुःख व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT