North Goa  Dainik Gomantak
गोवा

North Goa : उत्तर गोव्यात भाजपने काय विकास केला? अमित पाटकर

North Goa : ‘इंडिया’ आघाडीच्या खलपांचा प्रचार सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

North Goa :

हरमल, भाजपचे उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी खासदारकीच्या काळात उत्तर गोव्यात नेमका कोणता विकास केला, याचा खुलासा करावा.

''हर घर जल'' हा पंतप्रधानपदाचा कार्यक्रम म्हणून घोषणा केली, मात्र ''हर घर जल नही’ ही स्थिती आहे, अशी टीका गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

मांद्रे श्री भगवती देवीच्या चरणी श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून प्रचार कार्यास प्रारंभ केला. भाजपने गोव्याच्या निसर्गाचा विद्‍ध्वस चालविला असून अमलीपदार्थ व वेश्या व्यवसाय तसेच बलात्कार, खुनाची प्रकरणे भाजप सरकारच्या काळात वाढत आहेत, ही संस्कृती नाही, भाजपने या गोष्टींना प्रोत्साहन दिले आहे.

या भ्रष्ट जुमला पक्षाला जनता कंटाळली असून जनतेला ग्राह्य धरू नका, मतदार सुप्रीम आहे, असेही पाटकर म्हणाले.

म्हादईचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण, सुजलाम सुफलाम भूमी, पर्यटनविषयक सुविधा तसेच सीआरझेडसाठी सर्वसमावेशक नियोजन केले पाहिजे, असे खलप यांनी सांगितले. खलप यांना निश्चित निवडून आणा, असे गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांनी व्यक्त केले.

कोले काँग्रेसमध्ये दाखल

भाजपने राज्यातील टॅक्सी व्यवसाय संपवला असून टॅक्सी मालकांवर लाठीहल्ला केला. त्यांना रस्त्यावर आणले आहे. दिवसाढवळ्या डोंगर कापणी, ध्वनी प्रदूषण होत आहे., कोले यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षाचा शेला व पुष्पगुच्छ देऊन कोले यांचे पक्षात स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT