Whale  Dainik Gomantak
गोवा

Ambergris Smuggling: 10 कोटी रुपयांची व्हेलची उलटी जप्त; सिंधुदुर्ग आणि गोव्यातील तिघांना अटक

Whale Vomit Smuggling Goa: आंतरराष्ट्रीय बाजारात सुंगधी सेंट, परफ्युम तयार करण्यासाठी व्हेलच्या उलटीची तस्करी केली जात होती. सांगे येथे एका वाहनात अ‍ॅम्बरग्रीसचा साठा आढळून आला.

Pramod Yadav

पणजी: आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणी गोव्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहा कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक सिंधुदुर्ग येथील आणि दोन गोव्यातील नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यातील सांगे येथे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सुंगधी सेंट, परफ्युम तयार करण्यासाठी व्हेलच्या उलटीची तस्करी केली जात होती. सांगे येथे एका वाहनात अ‍ॅम्बरग्रीसचा साठा आढळून आला. हा साठा किती होता याची माहिती अद्याप समोर आलेला नाही मात्र याची बाजारातील किंमत दहा कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

गुरुवारी उत्तररात्री केलेल्या या कारवाईत सिंधुदुर्ग येथील एक आणि मुरगाव आणि फोंडा येथील दोघे असे तिघांना अटक करण्यात आली आहे. संशियत सांगे येथे या मौल्यवान पदार्थाचा सौदा करण्यासाठी आला असता पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सांगे पोलिसांनी तिघांना अटक केली असून, याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) काय आहे?

देवमासा किंवा व्हेल मासा जेव्हा उलटी करतो त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात अ‍ॅम्बरग्रीस म्हणून ओळखले जाते. अ‍ॅम्बरग्रीस खूप महाग असून, त्याचा औषध, बड्या ब्रॅन्डची अत्तर बनविण्यासाठी वापर केला जातो. अ‍ॅम्बरग्रीसची कोट्यवधी रुपयांना विक्री केली जाते. याच्या तस्करीवर बंदी असून, कायद्याने त्याच्यावर कारवाई केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT