International Women's Day
International Women's Day Dainik Gomantak
गोवा

International Women's Day: पणजीत आज महिला कर्मचाऱ्यांचा सत्‍कार

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महानगरपालिकेतर्फे उद्या मंगळवार दि. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त मनपातील महिला कर्मचाऱ्यांच्‍या सेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साफसफाईसह विविध कामे करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्‍यात येणार आहे. त्‍यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्‍यात येईल.

मनपा आयुक्त आग्नेलो फर्नांडिस यांनी प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे. तत्‍पूर्वी, दुपारच्या सुट्टीआधी पणजी रोटरॅक्ट क्लबच्‍या सहकार्याने महिला कर्मचाऱ्यांसाठी होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळच्या सत्रात सफाई कामगार महिला, गार्डनर्स, कचरा गोळा करणाऱ्या महिला, महिला पर्यवेक्षक अशी कामे करण्यासाठी 25 वर्षांहून अधिक काळ योगदान दिल्याबद्दल त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात येणार आहे.

कोविड महामारीच्या काळात सेवा बजाविलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात येईल. महिलादिनानिमित्त मनपातर्फे नगरपालिका उद्यानात सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्‍याचा विचार आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT