Destination Wedding In Goa New Goa Manohar International Airport
गोवा

Mopa International Airport:...आणि मोपा विमानतळावरच झाली लग्नाला सुरूवात झाली, पाहा फोटो

गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करण्याची अनेकांची इच्छा असते. बॉलिवूड कलाकार असो, टॉलिवूड किंवा मराठीतील कलाकार यात मागे नाहीत.

Pramod Yadav

Destination Wedding In Goa: गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करण्याची अनेकांची इच्छा असते. बॉलिवूड कलाकार असो, टॉलिवूड किंवा मराठीतील कलाकार असो तसेच क्रिडा क्षेत्रातील नामांकित खेळाडू लग्नासाठी गोव्याची निवड करतात.

याचे महत्वाचे कारण म्हणजे गोव्यात असणारे निसर्गसौंदर्य, मनमोहक बीच आणि कमालीची शांतता.

अलिकडेच टीव्ही कलाकार कृष्णा मुखर्जीने तिचा प्रियकर चिराग बाटलीवालासोबत गोव्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो खूप गाजले. दरम्यान, गोव्यात एका लग्नाची सुरूवात नव्याने सुरू झालेल्या मोपा येथील मनोहर विमानतळावर झाली. याचे फोटो सध्या समोर आले आहेत.

Destination Wedding In Goa

मनोहर विमानतळावर एका लग्नाची सुरूवात झाली. या लग्नाचे फोटो विमानतळाच्या वतीने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात विमानतळावर लग्नाचे एक जोडपे आले असून, त्यांचे स्वागत काही मुली पार्टी सूटमध्ये नृत्य करत करताना दिसत आहेत.

जोडप्याचे गोव्यात लग्न करण्याच्या इच्छेला चार चाँद लावण्याचे काम विमानतळावर उपस्थित लोकांनी केले. नृत्य करत जोडप्याचे विमानतळावर स्वागत करण्यात आले.

Destination Wedding In Goa

विमानतळावरील या जोडप्याच्या स्वागताची छबी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्याचा मोह विमानतळावर उपस्थित लोकांना आवरता आला नाही.

जानेवारीत मनोहर विमानतळ सुरू करण्यात आले, त्यापासून राज्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

Destination Wedding In Goa

विमानळावरील चकाकी आणि झळाळी यामुळे या स्वागताची रंगत आणखी वाढली होती. जोडप्याचे नाव आणि ते कोणत्या ठिकाणचे आहेत, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, मनोहर विमानतळावरून आपल्या लग्नाची सुरूवात करत अनेकांप्रमाणे या जोडप्याने देखील गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करण्याची आपली इच्छेची सुरूवात हटके पद्धतीने पूर्ण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार भाग्यवान! श्रीविष्णूंच्या विशेष कृपेने या 3 राशींना नोकरीत मोठे यश, धनलाभाचेही प्रबळ योग

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

SCROLL FOR NEXT