MLA Ulhas Tuyekar dainik gomantak
गोवा

'दक्षिण गोव्यात वर्षभरात जिल्हा पंचायत भवन बांधण्यासाठी प्रयत्न करणार'

जिल्हा पंचायतींना अधिक निधी मिळण्याबरोबर त्यांना अधिकारही मिळावे यासाठी प्रयत्न करू

दैनिक गोमन्तक

मडगाव : दक्षिण गोव्यात नावेली मतदारसंघात जिल्हा पंचायत भवन बांधण्याचा जो प्रकल्प नियोजित केला आहे तो वर्षभरात पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दिले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे सदस्य असलेले उल्हास तुयेकर हे नावेलीतून तर आंतोन व्हाझ हे कुठ्ठाळीतून आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आज जिल्हा पंचायत मंडळाच्या वतीने त्या दोघांच्या सत्कार करण्यात आला. (We will try to get more funds for the district panchayats)

या सत्काराला उत्तर देताना तुयेकर (MLA Ulhas Tuyekar) यांनी आपण जिल्हा पंचायतीचे सदस्य असल्याने या संस्थेला येणाऱ्या अडचणी काय हे मला ठाऊक आहे. त्यामुळे जिल्हा पंचायतींना अधिक निधी (Funding) मिळण्याबरोबर त्यांना अधिकारही मिळावे यासाठी आपण आणि व्हाझ हे दोघेही विधानसभेत प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी बोलताना दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे (District Panchayat) उपाध्यक्ष खुशाली वेळीप यांनी जिल्हा पंचायतीतून आमदार (MLA) म्हणून निवडून येण्याची परंपरा तुयेकर आणि व्हाझ यांनी कायम ठेवली. यापुढे याच पंचायतीतून आणखी आमदार पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर व आमदार आंतोन व्हाझ यांचीही भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT