Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

'आप'चे सरकार स्थापन झाल्यास 24 तासांत भ्रष्टाचार संपवणार: पालेकर

पालेकर यांनी शुक्रवारी सांताक्रूझमधून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: सांताक्रुझमध्ये लोक बदल शोधत आहेत आणि मी तो बदल घडवून आणण्याचे वचन देतो. आम आदमी पार्टीचे उमेदवार निवडून आल्यास, मूलभूत सुविधा मिळतील. ''आप''चे सरकार स्थापन झाल्यानंतर 24 तासांत राज्य सरकारमधील भ्रष्टाचार संपवणे हे पहिले ध्येय असेल, असे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अमित पालेकर म्हणाले. (Amit Palekar AAP Goa News)

पालेकर यांनी शुक्रवारी सांताक्रूझमधून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. गोव्याचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी पालेकर यांनी महालक्ष्मी देवी आणि गोयच्या सायबाचे आशीर्वाद घेतले. गोवेकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. गोवा वारसा स्थळ संरक्षित करण्यासाठी लढा दिलेल्या जुने गोवे येथे जाऊन त्यांनी निषेध स्थळालाही भेट दिली.

गोवेकरांची सेवा करणार

अमित यांच्या पत्नी रसिका पालेकर यांनी सांगितले, की सामान्य व्यक्ती केवळ अशा पदाचे स्वप्न पाहू शकते, परंतु 'आप'ने अमितच्या दूरदृष्टीला पंख दिले आहेत. आमच्याकडे प्रामाणिक, विश्वासार्ह आणि दयाळू असा नेता आहे. तर अमित यांच्या आई आणि मेरशीच्या दोन वेळा सरपंच असलेल्या ज्योती पालेकर म्हणाल्या, की मी वचन देते की पालेकर सर्व गोवेकरांची सेवा करणार आणि राज्याच्या विकासात योगदान देणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Inspection: अन्न सुरक्षेवर भर; 'एफडीए'कडून 29.09 लाखांचा दंड वसूल, 325 हून अधिक आस्थापनांची पाहणी

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Guinea Landfill Collapse: पहाटेची झोप ठरली अखेरची! कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू; गिनी देशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT