Task Force Meet About Kala Academy Work Dainik Gomantak
गोवा

Kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम कृती दलाकडून 'नापास', काय नोंदवले मत वाचा

Kala Academy Goa: कृती दलाने पुनरावलोकन करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांची मदत घेण्याची गरजदेखील व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy Goa

पणजी : कला अकादमीसारख्या देशातील प्रतिष्ठित इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत कृती दलाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. झालेल्या कामांची टक्केवारीही उत्तीर्ण होण्यासारखी नाही, असेही दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी सांगितले.

कला अकादमी नूतनीकरणाच्या कामांची सोमवारी कृती दलाने पाहणी केली होती. त्यावेळी आम्ही आज (मंगळवारी) बैठक घेऊन त्या पाहणीत आढळलेल्या गोष्टी मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ११ सदस्यीय बैठक पार पडली.

कृती दलाने पुनरावलोकन करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांची मदत घेण्याची गरजदेखील व्यक्त केली. आता झालेली चूक पुन्हा होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असे केंकरे यांनी सांगितले.

अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी कोट्यवधीचा खर्च झाला. यात कंत्राटदारांची चूक असेल तर त्यांना काय मिळणार नाही, जी आर्थिक तरतूद होती त्यातच ते काम करावे लागेल. त्यासाठी त्यांना बोलावून त्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे. या कामासाठी जेवढे कंत्राटदार आहेत, तेवढ्या सर्वांना १० नोव्हेंबरला बोलवण्यात आले आहे.
विजय केंकरे, कृती दलाचे अध्यक्ष

झालेल्या कामाबाबत कृती दल समाधानी आहे का, असे विचारल्यावर केंकरे म्हणाले की, टक्केवारीत विचारले तर ते काम उत्तीर्ण होण्यासारखे नाही. त्यात बरेच काही करावे लागणार आहे. या बैठकीनंतर आपण खरोखर समाधानी नाही, हे स्पष्ट आहे.

या अकादमीचे पावित्र्य राखले पाहिजे. नक्की काय चुका झाल्या आहेत, हे आम्ही तज्ज्ञांना विचारणार आहोत. झालेल्या खर्चापेक्षा अतिरिक्त खर्च होणार नाही. तिची प्रतिष्ठा परत मिळवून देण्यासारखे नूतनीकरणाचे काम होणे अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drishti Lifesavers Rescue: रशियन महिला अडकली समुद्रात, फ्रेंच महिलेवर भटक्या जनावराचा हल्ला; दृष्टी जीवरक्षकांकडून 10 जणांना जीवदान

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Goa News: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश; वाचा दिवसभरातील घडामोडी

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Diwali 2024: फोव कांडप गेलें मात गोंयान 'परंपरा' जपली!

SCROLL FOR NEXT