Bihar Governor Rajendra Arlekar Dainik Gomanntak
गोवा

गोवा के लोग अजीब है! राज्यपाल आर्लेकरांनी खोडले पंडीत नेहरुंचे 'ते' वक्तव्य, म्हणाले, 'आम्ही भारताचाच भाग'

Bihar Governor Rajendra Arlekar: आम्ही अजीब नाही आम्ही भारतीय आहोत, असे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले.

Pramod Yadav

Bihar Governor Rajendra Arlekar On Nehru

पणजी: अजीब है गोवा के लोग, असे पंडित जवाहरलाल नेहरु एकदा म्हणाले होते. पण आम्ही अजीब नाही आम्ही भारतीय आहोत, असे म्हणत बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नेहरुंचे वक्तव्य खोडून काढले. ‘चैतन्य प्रतिष्ठान गोवा’तर्फे कला अकादमी येथे आयोजित ‘एक राखी सैनिकांसाठी’ या कार्यक्रमात आर्लेकर बोलत होते.

काय म्हणाले बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? (Bihar Governor Rajendra Arlekar On Nehru)

'देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु एकदा म्हणाले होते की, अजीब है गोवा के लोग! पण आम्ही अजीब नाही, आम्ही भारतातचाच एक भाग आहोत. काही लोक गोव्याचा संबंध पोर्तुगालशी जोडण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही भारतीय आहोत', असे बिहार राज्यपाल आणि मूळचे गोमंतकीय राजेंद्र आर्लेकर म्हणाले.

गोव्यातील तरुण सैन्य भरतीत कमी सहभागी होतात, यावरुन आर्लेकारांनी नाराजी देखील व्यक्त केली. गोव्यातील नागरिकांना सैन्याचे काम कसे चालते हे कळण्यासाठी येत्या काळात नो युवर आर्मी प्रदर्शन भरवले जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

भारतातील अनेकांनी पोर्तुगिजांच्या जोखडातून गोव्याची मुक्ती करण्यासाठी योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे गोव्यातील अनेकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. दरम्यान याची एकत्रित नोंद पाहायला मिळत नाही. या गोष्टींची एकत्र नोंद ठेवायला हवी, असे राज्यपाल आर्लेकर म्हणाले.

विविध देशांमध्ये सैन्य प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. तज्ञांनी याचा विचार करुन भारतात देखील या गोष्टी राबविण्याचा प्रयत्न करायला हवा. सरकारी नोकरीत येऊ इच्छित असणाऱ्यांना दोन वर्षाचे सैन्य प्रशिक्षण बंधनकारक करावे, असेही आर्लेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT