Sexual assault Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, टँकर चालकाला बेड्या

पर्वरी पोलिसांची कारवाई, मागील वर्षभरापासून अत्याचार सुरु असल्याची तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी एका नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी व्यक्ती हा पाण्याच्या टँकरचा चालक असल्याची माहिती आहे. रविवारी पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.

हळदोणे (Aldona) येथे राहणाऱ्या 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाण्याच्या टँकरवर चालक असलेल्या संदीप चोडणकर या 40 वर्षीय आरोपी इसमाला बेड्या ठोकल्या आहेत. पर्वरी पोलिसांनी आरोपीला बेड्या (Arrest) ठोकत त्याची कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास सुरु केला आहे. आरोपीला आज न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

आरोपी टँकर चाकल मागील वर्षापासून पीडित तरुणीला त्रास देत होता. मात्र तरुणीने घाबरून याची कुठेही वाच्यता केलेली नव्हती. मात्र जेव्हा ही गोष्ट पीडित मुलीच्या आईला कळाती, तिने पर्वरी पोलिसात (Police) धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पर्वरीतील एका जुन्या इमारतीमध्ये आरोपी संबंधित पीडितेवर अत्याचार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT