Water shortage Siolim  Dainik Gomantak
गोवा

Siolim Water shortage : सागर उशाला; तरी कोरड पडलीय घशाला! आसगाव, शापोरावासीयांची व्यथा

Siolim Water shortage : दर पाच वर्षांनी सरकारे बदलतात, पंचायत मंडळेही नवीन स्थापन होतात. परंतु या भागातील लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करावी या उद्देशाने एकाही आमदार वा मंत्र्याने आत्तापर्यंत पोटतिडकीने प्रयत्न केलेले दिसत नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

संतोष गोवेकर

Siolim Water shortage :

शिवोली, आसगाव पंचायत क्षेत्रातील बादे तसेच हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील शापोरा येथील लोकांनी आत्तापर्यंत जितकी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने केली आहेत, तितकी आंदोलने आत्तापर्यंत अन्य कुठल्याही कारणांसाठी झाली नसतील.

तसे पाहता बादे आणि शापोरा ही दोन्ही गावे समुद्रतटावर वसलेली आहेत. परंतु समोर अथांग सागर असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण पावसाळ्यातही अन् उन्हाळ्यातही होते.

दर पाच वर्षांनी सरकारे बदलतात, पंचायत मंडळेही नवीन स्थापन होतात. परंतु या भागातील लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करावी या उद्देशाने एकाही आमदार वा मंत्र्याने आत्तापर्यंत पोटतिडकीने प्रयत्न केलेले दिसत नाहीत. म्हणूनच तर भर पावसातही येथील महिला-पुरुष म्हापशातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर वारंवार ‘घागर मोर्चा’ काढताना दिसतात.

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा गलथानपणा :

बार्देशातील बहुतेक भागाला नियमित व आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना केवळ शापोरा आणि बादे भागातच पाण्याचे दुर्भिक्ष्य का?. याबाबत अनेकांकडे विचारणा केली असता पाणीपुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी अनियमितपणे पाणी सोडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर गावात मोठमोठे रहिवासी प्रकल्प उभारण्यात येत असल्याने त्यास पाणीपुरवठा केला जातो.

खासगी टॅंकरवाल्यांची होतेय चांदी

अनेकांच्या घरात नळजोडण्या आहेत. परंतु टेरेसवरील चार मीटर उंचीच्या टाकीत आत्तापर्यंत कधीच पाणी पुरेपूर भरल्याचे आपण पाहिले नसल्याचे या भागातील लोक संतापून सांगतात. पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टॅकरवाल्यांची यामुळे चांदी होते.

शिवोली तसेच आसगाव भागात आपल्या मालकीच्या जागेत विहिरी खोदून पाणीपुरवठा करणारे टॅंकरमागे प्रत्‍येकी आठशे ते हजारभर रुपये आकारतात. खासगी टॅंकरवाल्यांमुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय होत असली तरी सामान्याला हे दर परवडणारे नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT