Water Shortage in Valpoi Goa Dainik Gomantak
गोवा

सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर... म्हाऊस गावात पाण्याविणा नागरिकांचे हाल; मोर्चा काढण्याचा दिला इशारा

म्हाऊस गावातील देसाईवाडा परिसरात पाण्याची तीव्र टचाई; नागरिक हैराण

दैनिक गोमन्तक

Water Shortage Problem: म्हाऊस पंचायत क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावात नळाला पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यात टॅंकर आठ दिवसातून एकदा येत असल्याने गावातील रहिवासी नाराज झाले आहे.

नदीचे पाणी सुध्दा आता आटले असून पाण्याविणा नागिरकांना दिवस काढावे लागत आहे. यावेळी वारंवार पाणी टंचाई असल्याची तक्रार संबंधीत खात्याला व पाणी सोडण्याऱ्या आॅपरेटरकडे केली होती. त्यानंतर एक दिवस पाणी सोडले जाते व टॅंकर पाठविला जातो, मात्र पुन्हा तोच प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

काही वेळेला पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याचा प्रकारही इथे घडत असतो. काही घरे उंचावर असल्याने त्या घरांना पाणीच पोहतच नाही. तसेच टॅंकर नियमित येत नसल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. काही महिलांनी सांगितले की पाण्याच्या बाटल्या विकत आणून पाणी पिण्याची वेळ आलेली आहे.

यावेळी वाळपई पाणी पुरवठा कार्यालयावर गावातील महिलांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र कार्यालयात सहाय्यक अभियंता रोहिदास नाईक सुट्टीवर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. तिथे असलेले अधिकारी फक्त तोडगा काढण्याचे आश्वासन देतात.

यावेळी देसाई वाडा व पंचायत वाड्यावरील सुमारे 20 महिलांची उपस्थिती होती. गावातील महिलांतर्फे तक्रारीचे निवेदन कार्यालयात देण्यात आले आहे. जर सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर गावातील सर्व महिलांतर्फे कार्यालयावर पुन्हा मोर्चा घेऊन येणार, असा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

SCROLL FOR NEXT