Water Shortage  Dainik Gomantak
गोवा

Water Shortage: पाणी टंचाईमुळे स्थानिक संतप्त, शिवोलीत घागर प्रोटेस्ट

Water Shortage at Siolim: शिवोली,हणजूणा, व्हागातोर या भागात PWD विभागाच्या विरुद्ध आंदोलन

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa,Goa

म्हापसा: उत्तर गोव्यातील म्हापसा या भागात पाणी टंचाई असल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. शिवोली,हणजूणा आणि व्हागातोर या भागातील स्थानिकांनी रस्त्यावर उतरत PWD विभागाच्या विरुद्ध आंदोलन सुरु केले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हणजूणा आणि व्हागतोर या भागांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून पाणी टंचाईच्या समस्येने स्थानिकांना ग्रासले आहे. वेळेतच हा प्रश्न सोडवला जावा म्हणून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनवणी केली होती मात्र यावर कोणतीही उपाय-योजना करण्यात आली नाही. हा प्रश्न असाच सुरु राहिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असेही ग्रामस्थ म्हणाले होते.

शिवोलीत देखील पाणी टंचाई असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. गेल्या अनेक आठवड्यांपासून कमी पाणी पुरवठा झाल्याने दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय येतोय. वेळोवेळी स्थानिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे या समस्यांची नोंद करण्यात आली होती.

मात्र अधिकाऱ्यांनी याची दाखल घेत योग्य कार्यवाही न केल्याने आता स्थानिकांचा संताप वाढला आहे. खास करून महिला या समस्याविरुद्ध आवाज उठवत असून याला घागर प्रोटेस्टचे नाव देत PDW कार्यालयापर्यंत स्थानिकांनी आंदोलन चालवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT