Water Shortage in canacona  Dainik Gomantak
गोवा

Canacona Water Shortage : घशाला कोरड, खिशाला कात्री ;पाणीप्रश्‍न जटिल

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Water Shortage :

काणकोण भर मे महिन्यात राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाई भेडसावत असल्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

सरकारी अधिकारी राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असून पाणीटंचाई नसल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षातील चित्र दयनीय आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत.

काणकोण तालुक्याची तहान भागविणाऱ्या चापोली, गावणे धरणात पुरेसा जलसाठा आहे, परंतु येथील नळांना पाणीच येत नाही. त्‍यामुळे काणकोणवासीयांचे पाण्‍याविना हाल होत आहेत. चापोली धरणात असलेला जलसाठा तीन महिने पुरेल एवढा असल्याचा दावा पाणीपुरवठा खात्याचे अभियंते करत आहेत. परंतु सध्‍या दापट, माड्डीतळप, शेळी, पोळे येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

टँकर व्यवसाय ठरला फायदेशीर

राज्यात जागोजागी पाणीटंचाई जाणवत असली, तरी त्यामुळे टँकर व्यावसायिकांची अक्षरश: ‘चांदी’ झाली आहे. आसगाव, हणजूण या किनारपट्टी भागातील गावांमध्ये साबांखाच्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टँकर व्यवसाय फोफावला आहे.

इतर वापरासाठी पाण्याच्या टँकरचे दर ७०० ते दीड हजार रुपये व पिण्याचा पाण्याच्या टँकरचे दर वेगळेच आहेत. त्यामुळे एकप्रकारे टँकर व्यावसायिकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.

...अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई

सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर पाणीटंचाईची समस्‍या मांडण्‍यात आल्‍याचे दापट येथील कॉस्‍ता यांनी सांगितले. यावेळी सभापतींनी जलपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना ‘त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ असा सज्जड इशारा दिला आहे. काणकोण पालिका क्षेत्रातील मास्तीमळ व अन्य भागांतही चार-चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याचे नगरसेवक धीरज नाईक गावकर यांनी सांगितले.

जलशुद्धीकरण प्रकल्पाचा अभाव

चापोली धरणात सध्‍या ३२.१० मीटर जलसाठा आहे. या जलाशयाची पूर्ण क्षमता ३८.७५ मीटर आहे. गावणे धरणात सध्‍या ५७.७० मीटर पाणी आहे. त्याची पूर्ण क्षमता ६३.५० मीटर म्हणजे १७७ हेक्टोमीटर आहे. मात्र, या धरणातील पाणी वापरण्यासाठी तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारलेला नाही. हे पाणी थेट श्रीस्थळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात नेण्याचीही व्यवस्था केलेली नाही. गरज पडेल तेव्हा हे पाणी तळपण नदीत सोडून अर्धफोंड येथील डोहात साठविण्यात येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT