Mandrem Water Issue
Mandrem Water Issue 
गोवा

Mandrem Water Issue: नेत्यांना आश्‍वासनांचा विसर तर लोकांची पाण्यासाठी वणवण, मांद्रेत पाणी प्रश्‍न काही सुटेना

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem Water Issue मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून टँकरद्वारे अल्पप्रमाणात पाणीपुरवठा होत असल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. ज्या घरांपर्यंत रस्ता नाही, त्या ठिकाणी टॅंकरचे पाणी पोचत नाही.

त्यामुळे त्यांना पाण्यासाठी वणवण भ्रमंती करावी लागत आहे. गेले काही दिवस नळ कोरडे असून राजकीय नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनाच विसर पडल्याने ग्रामस्थ नेत्यांवर नाराज आहेत.

आमदार जीत आरोलकर स्वखर्चाने दर दिवशी मांद्रे मतदारसंघातील एकूण नऊही पंचायत क्षेत्रामध्ये पाण्याचे टँकर फिरत आहेत. पण हे पाणी सगळीकडे पोचत नाही. मांद्रे मतदारसंघातील पाण्याच्या समस्येविषयी आमदार आरोलकर म्हणाले, आपण समस्या चार वर्षाच्या कालावधीत सोडवणार आहे.

तुये येथे नवीन पाणी प्रकल्प होणार असून त्याचे काम सुरू व्हावे. यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून प्राथमिक स्तरावर काम सुरू झाले आहे. 30 एम एल डी पाणी प्रकल्प ज्यावेळी पूर्ण होईल, त्यावेळी मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या सुटले.

तोपर्यंत सरकार आणि मांद्रे उदरगत या संस्थेमार्फत मांद्रे मतदारसंघातील गरजवंतांना पाणीपुरवठा वेळेवर केला जात आहे. ही समस्या काही आताच उद्‍भवलेली नाही.

यापूर्वीही ती समस्या होती. लोकसंख्या आणि दर दिवशी येणारे पर्यटक, यांची संख्या वाढल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होत आहे. तरीसुद्धा तोपर्यंत जनतेला ज्या भागात पाणीपुरवठा नळाद्वारे होत नाही, त्यांनी आपल्या कार्यालयात संपर्क साधावा. त्यांना वेळेवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

सरकारने हल्लीच प्रत्येक घरासाठी एकूण सोळा हजार लीटर पाणी मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. त्याचा लाभ अनेकांना होत आहे. परंतु काही जणांना महिन्याला एक लीटर देखील पाणी येत नाही. मात्र नियमित पाण्याची बिले येतात. याचा विचार शासनाने करायला हवा.

- रजनी इब्रामपूरकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT