Pipeline Burst Dainik Gomantak
गोवा

Pipeline Burst : जलवाहिनी फुटल्याने ‘भाटले’ जलमय

काहींच्या घरात पाणी; ताळगाव, सांतआंद्रेतील पुरवठ्यावर परिणाम

गोमन्तक डिजिटल टीम

Pipeline Burst : सांडपाण्याची वाहिनी घालण्याचे काम करताना भाटले येथील जलवाहिनी फुटल्याने परिसरात सगळीकडे पाणी पसरले. पाण्‍याचा जोर मोठा असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांची तारंबळ उडाली. जलवाहिनी फुटलल्याने ताळगाव आणि सांतआंद्रेतील काही भागांमध्ये पुरवठा काहीकाळ खंडित होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली आहे.

बऱ्याच दिवसांपासून या परिसरात सांडपाणी वाहिनी घालण्यासाठी खोदकाम सुरू आहे. त्यात बुधवारी सायंकाळी 5.30 वा. ते 6 वा. सुमारास 600 एमएमची पीआय जलवाहिनी फुटल्याने पाणी परिसरात शिरले. काही घरांतही पाणी घुसले होते. नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यात सायंकाळची वेळ असल्याने वाहतूकदारांना देखील याचा त्रास झाला.

जलवाहिनी फुटल्याने आम्ही तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून युद्ध पातळीवर ते पूर्ण केले जाईल. या ठिकाणी भूमिगत वीज वाहिनी आणि इतर काही केबल असल्याने काळजीपूर्वक काम करावे लागतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फर्निचरही पाण्यात

जलवाहिनी फुटल्याने घरात अचानक पाणी शिरल्याने तिवरे यांच्या कुटुंबांची मोठी धावपळ उडाली. घरातील पाणी बाहेर काढताना त्यांना नाकीनऊ झाले होते. पाण्यात फर्निचर, चार्जर्स, लॅपटॉप व इतर साहित्य बुडाल्याने त्यांचे नुकसानही झाले.

कंत्राटदाराला भुर्दंड

आज गुरुवारी नवीन जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ताळगाव आणि सांतआंद्रेतील भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे. जलवाहिनी फोडल्याबद्दल कंत्राटदाराकडून खर्च वसूल करून घ्यायचा की नाही ही प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती जल विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती पार्सेकर यांनी दिली.

परिसरात चिंता

अचानक जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पाण्याचा साठा नाही, अशा नागरिकांकडून मात्र चिंता व्यक्त झाली. उद्या पाणी मिळणार नाही, अशी बातमी पसरताचा काही नागरिकांनी धावपळ सुरु केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT