Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: धुळेरमध्ये खोदकामाच्या दरम्यान जलवाहिनी फुटली, दुकानांमध्ये शिरलं पाणी

Dhuler Water Pipeline Break: धुळेर येथे खोदकाम करतेवेळी जेसीबीकडून ६०० एमएमची जलवाहिनी फुटली. परिणामी, लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : धुळेर येथे खोदकाम करतेवेळी जेसीबीकडून ६०० एमएमची जलवाहिनी फुटली. परिणामी, लाखो लिटर पाण्याची नासाडी झालीच, शिवाय काही दुकानांमध्‍ये पाणी शिरले. सॉ-मीलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ही घटना बुधवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. सध्या म्हापसा शहरात पेयजल खात्यातर्फे (डीडीडब्लू) नवीन जलवाहिनीचे जाळे उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

त्यानुसार, करासवाडा ते धुळेर मुख्य रत्याच्या बाजूने घटनेच्या वेळी हे खोदकाम सुरू होते. त्यावेळी सिद्धार्थ हॉलसमोर जेसीबीकडून खोदकाम करताना जलवाहिनी फोडली गेली.

यामुळे ६०० एमएम क्षमतेच्या जलवाहिनीतील पाणी फवाऱ्यांसह बाहेर पडले. हे पाणी रस्त्याच्या शेजारील दुकाने, सकल भागातील सॉ-मिल व आणि वाहन पार्किंगच्या स्थळी शिरले आणि याभागात पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

SCROLL FOR NEXT