Mine At Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: खंदकातून पाणी उपसा; तीन गावांना धोका

Mine Water Pumping: हे पाणी सोडताना कोणत्याही सरकारी यंत्रणेला याची पूर्वकल्पना दिलेली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात पावसाचा जोर वाढला असतानाही डिचोली शहराला लागून असलेल्या खाण खंदकातून पंपिंग करून पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडताना कोणत्याही सरकारी यंत्रणेला याची पूर्वकल्पना दिलेली नाही. यदाकदाचित पावसाचा जोर वाढला तर या पाण्यामुळे डिचोली, लामगाव आणि मुळगाव या तीन गावांना धोका निर्माण झाला आहे.

सध्या डिचोलीतील नदीला जोडणाऱ्या नाल्यात हे पाणी सोडण्यात येत आहे. एका बाजूने जोरदार पाऊस आणि दुसऱ्या बाजूने खाण खंदकातून पाणी सोडल्याने लोक भयभीत झाले आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. लामगावच्या माथ्यावरील खाणखंदक तुडुंब भरले आहे. खाणखंदकाच्या भोवतालच्या मातीचा भराव कोसळत असल्याचे आढळून येत आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सध्या हा खाणखंदक अत्यंत धोकादायक बनला आहे. पावसाचा जोर वाढला आणि अशाच वेगाने पाणी सोडले, तर मोठी आपत्ती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खाण सुरक्षित : ‘वेदान्ता’चा दावा

वेदान्ता कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, खाणीचा भाग कोसळलेला नाही. सुरक्षिततेविषयी पूर्ण काळजी घेतली आहे. खाणीबाबत पसरवली जाणारी माहिती खोटी आहे. जबाबदार खाण व्यवस्थापनाबाबत कंपनी वचनबद्ध आहे. स्थानिकांची सुरक्षितता कंपनीने सुनिश्चित केली आहे.

लामगावच नव्हे, तर अन्य खाण खंदकांची स्थितीही धोकादायक बनली आहे. डिचोलीत खाण व्यवसाय सुरू करताना कोणतीच उपाययोजना हाती घेतलेली नाही. सध्या या खंदकांची भयानक स्थिती पाहता कधी ना कधी ते कोसळतील. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. प्रशासनाने आधीच सजग व्हावे.
रमेश गावस, पर्यावरण अभ्यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT