Heavy Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Heavy Rain In Goa: फोंडा बसस्थानक भागामध्ये पाणी

Heavy Rain In Goa: वीजपुरवठा खंडित : बेतोड्यातही पडझड

दैनिक गोमन्तक

Heavy Rain In Goa: फोंड्यात बुधवारी सकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने फोंड्यातील जुने बसस्थानक पाण्याखाली गेले. अचानक बरसलेल्या पावसाने सर्वांची धावपळ उडाली. पहाटे विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.

फोंडा पालिका क्षेत्रातील गटारे पाण्याने भरल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. पहाटे वीजपुरवठा खंडित झाला होता, मागाहून तो सुरळीत करण्यात आला. बेतोडा-निरंकाल येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.

मंगळवारी मध्यरात्री पावसाला सुरवात झाली तर बुधवारी पहाटे मोठ्या सरी कोसळल्या. सकाळी कामानिमित्त जाणाऱ्या लोकांची धांदल उडाली. फोंडा बसस्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने बसस्थानकावरील दुचाक्या अर्ध्या पाण्यात बुडाल्या होत्या. मागाहून पाऊस ओसरल्यानंतर पाणी कमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT