Panaji  Dainink Gomantak
गोवा

Panaji Smart City : कचरा व्यवस्थापन : पणजी स्मार्ट सिटीला अठरावे स्थान

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Smart City :

पणजी, कचरा व्यवस्थापनासाठीच्या ‘सिटीज २.० चॅलेंज’ या नावीन्यपूर्ण आणि शाश्‍वत नागरी विकासाला चालणा देणाऱ्या राष्ट्रीय उपक्रमात शंभर स्मार्ट शहरांमधून आघाडीच्या (टॉप) अठरा विजेत्यांमध्ये पणजी स्मार्ट सिटीची निवड झाली आहे.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘सीटीज २.० चँलेज’ हा उपक्रम जाहीर केला होता.

ही संकल्पना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी), क्रेडिटान्साल्फर वेडेराफबू (केएफडब्ल्यू), युरोपियन युनियन (ईयू) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स (एनआययूए) यांच्या सहयोगाने निर्माण झाली आहे. त्यामुळे या संकल्पनेनुसार विजेत्या ठरलेल्या शहरांना महत्त्वपूर्ण आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य करण्यात येणार आहे.

पणजी स्मार्ट सिटीचा ‘सीटीज २.०’च्या विजेत्यांमध्ये समावेश झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरणीय जीवनमान उपक्रमातून प्रेरणा मिळाली आहे.

‘आमची स्वच्छ पणजी - समृद्ध पणजी’साठी कोणताही भराव न टाकता नियोजन करणे, हा विजयी प्रस्ताव पणजीच्या नागरिक केंद्रित आणि कचरा व्यवस्थापनाच्या विकेंद्रित मॉडेलला प्रोत्साहन देणारा आहे.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्ज (आयएसएस), समीउद्दीन शेख आणि सिद्धांत वेर्णेकर, सचिन अंबे (महानगरपालिका) आणि अलिशा साहू (गिझ) यांनी हे मॉडेल सत्यात उतरवले आहे.

पणजी स्मार्ट सिटीच्या नावीन्यपूर्ण कचरा व्यवस्थापन योजनेने, ‘आमची स्वच्छ पणजी’ने आम्हाला ‘सीटीज २.० चॅलेंज’च्या टॉप १८ विजेत्यांमध्ये स्थान मिळवून दिले आहे, याचा आम्हाला कमालीचा अभिमान आहे.

हे यश इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडमधील आमची संपूर्ण टीम आणि आमच्या घटकांच्या अथक परिश्रमांचे मोल आहे. त्याशिवाय पणजीतील नागरिकांचेही हे यश असून त्यांनी केलेल्या सहकार्याशिवाय असे यश मिळणे शक्य नव्हते.

- संजित रॉड्रिग्ज, सीईओ-एमडी, आयपीएससीडीएल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT