Water Problem Dainik Gomantak
गोवा

तुये-मुरमुसेवासीयांचा इशारा: पाणी द्या, अन्‍यथा मोर्चा

दोन महिन्‍यांपासून नळ कोरडे

दैनिक गोमन्तक

मोरजी: तुये-मुरमुसे इस्‍पितळ परिसरातील सुमारे 90 घरांना मागच्या दोन महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. ही समस्‍या त्‍वरित सुटली नाही तर पाणी विभागावर घागरमोर्चा नेण्याचा इशारा स्थानिक पंचसदस्य आनंद साळगावकर यांच्यासह ग्रामस्‍थांनी दिला आहे.

आम्हाला दिवसाकाठी किमान तीन तास तरी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा व्‍हायला पाहिजे. चांदेल जलप्रकल्पातून दरदिवशी पेडणे तालुक्‍याला पंधरा एमएलडी पाणी सोडले जाते. पण ते खूपच अपुरे पडू लागले आहे. कारण तालुक्‍यात एकूण २० ग्रामपंचायती आणि एका नगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे. लोकसंख्याही वाढलेली आहे. त्याचप्रमाणे लहान-मोठे उद्योग, व्यवसाय आलेले आहेत. साहजिकच पाण्याची मागणी वाढली आहे. दुसरीकडे चांदेल प्रकल्पाचा विस्तारही योग्य पद्धतीने होत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस तीव्र होऊ लागली आहे.

पेडणे तालुक्यात नियोजित प्रकल्‍पांचे काम सध्‍या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यांनाही पाणीपुरवठा करण्यास सरकार बांधील आहे. त्यामुळे सरकार चांदेल प्रकल्पाचे पाणी इतरत्र वळवते की काय अशी भीती नागरिकांना सतावत आहे. तुये पंचायत क्षेत्रातील मुरमुसे या गावात सध्या पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. मागच्या सहा महिन्यांपूर्वी संबंधित खात्याच्‍या सर्व अधिकाऱ्यांची ग्रामस्‍थांसमवेत संयुक्त बैठक झाली. त्यावेळी पाण्याचा विषय ऐरणीवर आला होता. पण अजूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT