Fast Food Stalls in Margao Dainik Gomantak
गोवा

नियम पाळा;अन्यथा कारवाईला सामोरे जा : मडगाव पालिका

‘फास्ट फूड’वाल्यांना इशारा

दैनिक गोमन्तक

मडगाव : शहराच्या विविध भागात कार्यरत असलेल्या फास्ट फूडवाल्यांबाबतच्या तक्रारींची गंभीरपणे दखल घेऊन मडगाव पालिकेने त्यांना स्वच्छतेसह नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा अन्यथा, कारवाईस सामोरे जावे लागेल, असे बजावले आहे.

पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांनी बुधवारी सायंकाळी स्वच्छता निरीक्षक विराज आरांबेकर व संजय सांगेलकर यांच्या समवेत जुन्या बसस्थानकावर जाऊन तेथील फास्ट फूड व्यवहाराची पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक जॉन आल्वारिस व राजेंद्र आजगावकर उपस्थित होते.

शीतपेय विकता येणार नाही, सामान घेऊन रिक्षा आणता येणार नाही, की गटारात सांडपाणी सोडू नये,अशा सूचना आराबेकर यांनी केल्या.

...तर पाच हजार दंड

पाहणीनंतर मुख्याधिकारी रोहित कदम यांनी फास्ट फूडवाल्यांना त्यांनी सर्वत्र परिसर अस्वच्छ करू नये,व्यवसायानंतर गाडे तेथून हटवावेत, तो भाग आरोग्यदायी ठेवावा, तयार होणारा कचरा वेगवेगळा करून व्यवस्थित ठेवावा, वगैरे सूचना केल्या. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास पाच हजारांचा दंड ठोठावावा लागेल, असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT