Captain Of Ports Dainik Gomantak
गोवा

Captain Of Ports: हाय टाईडमुळे किनारी भागात इशारा; जहाजांंना जलवाहतूकीला बंदी, मात्र कसिनो...

पुढील आदेश मिळेपर्यंत तत्काळ जलवाहतूक थांबविण्याचे आणि संबंधित जेटींवर परत जाण्याच्या सूचना

दैनिक गोमन्तक

Captain Of Ports: हवामानातील बदल पाहता सध्या राज्यातील किनारी भागात तीव्र लाटांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळेच गोव्याच्या किनार्‍यासाठी बंदर कप्तान खात्यातर्फे उच्च आणि धोकादायक लाटांचा इशारा जारी करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील समुद्र आणि नद्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व क्रूझ, फीडर तसेच जहाजांना पुढील आदेश मिळेपर्यंत तत्काळ जलवाहतूक थांबविण्याचे आणि संबंधित जेटींवर परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षित अँकरेज तसेच कॅसिनो जहाजांनाच फीडर बोट्स फक्त आपत्कालीन कारणांसाठी वापरता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या आदेशाचे सक्त पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील आदेशानंतरच इतर क्रूझ किंवा जहाजांना जलवाहतूक करता येणार आहे.

दरम्यान, एल निनो, बिपरजॉय चक्रीवादळ तसेच इतर काही कारणांमुळे आठवड्याभरानंतर गुरुवारी केरळात मॉन्सूनने हजेरी लावली आता मॉन्सून चांगली प्रगती करत असून येत्या 24 तासांत कर्नाटकात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे.

गोव्याच्या काही भागात 11 जूनपर्यंत मेघगर्जनेसह तुरळक पाऊस बरसण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. आज पणजी येथे कमाल 35.8 अंश सेल्सिअस, तर किमान 27.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT