Goa High Court ruling Dainik Gomantak
गोवा

Ponda Accident: भीषण अपघातानंतर मशिनरी पेटवली, कामगारांना मारहाण! दोघांना अटक; 16 जणांविरोधात गुन्‍हा दाखल

Warkhanda Ponda Accident: मशिनरीचे मालक उसगाव येथील पार्किलो रॉड्रिगीस यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात मशिनरी जाळल्याने सुमारे १ कोटी रुपयांची नुकसानी झाल्याचे म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Violence Case : वारखंडे-फोंडा येथील भीषण अपघातानंतर बांधकामस्थळी एका मशिनरीला आग लावण्‍यात आली होती. या प्रकरणी तसेच बांधकामस्थळी जाऊन कामगारांना मारहाण केल्‍याप्रकरणी बिट्टू, सर्वेश, बबलू आणि सुहास अशा चौघांसह सोळा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मशिनरीचे मालक उसगाव येथील पार्किलो रॉड्रिगीस यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात मशिनरी जाळल्याने सुमारे १ कोटी रुपयांची नुकसानी झाल्याचे म्हटले आहे.

दरम्‍यान, दोघाजणांना फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक करण्याची शक्यता आहे. अर्थमुव्हिंग कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट ओनर्स असोसिएशनतर्फे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

लाकडी ओंडक्यांना आग; दोघे अटकेत

शापूर-बांदोडा येथे लाकडी ओंडक्यांना आग लावल्याप्रकरणी सहाजणांविरोधात पोलिसांनी गुन्‍हा नोंदविला आहे. गेल्या रविवारी ही घटना घडली होती. त्यात सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारदार मुल्ला एयाज याने म्हटले आहे. या तक्रारीनुसार दादापीर शेख, नवाझ शेख, तबरीझ, रघुनाथ भोसले, शैलेश भोसले, जुबेर व इतर काहींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या दादापीर शेख व मितेश नाईक यांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT