Meerut Police Arrested Tillu Singh 
गोवा

घराच्या वादातून गोळीबार; Girlfriend सोबत गोव्यात मौजमजा करणाऱ्या 'टिल्लू'ला मेरठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Goa Crime: पोलीस त्याचा शोध घेत होते आणि पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले असता टिल्लू पणजीत असल्याची खात्री झाली.

Pramod Yadav

पणजी: घराच्या वादातून गोळीबार करणाऱ्या संशयिताला मेरठ पोलिसांनी गोव्यातून अटक केलीय. संशयित गर्लफ्रेन्डसोबत गोव्यात फिरायला गेला असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करुन संशयित फरार झाला होता. पणजीत गर्लफ्रेन्डसोबत फिरताना पोलिसांनी त्याला अटक केली.

मेरठच्या नौचंडी पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्री नगर सेक्टर 1 येथील हे प्रकरण आहे. 21 सप्टेंबर रोजी सतेंद्र या व्यक्तीच्या घराबाहेर गोळीबार झाला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या प्रकरणात नीरज शर्मा उर्फ ​​टिल्लू पंडितचे नाव पुढे आले होते. नीरज शर्मावर २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांना पाळत ठेवणाऱ्या पथकाकडून त्याचे लोकेशन गोव्यात मिळाले.

शास्त्री नगर सेक्टर-१ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी सतेंद्रने भाऊ शैलेंद्र कुमार, बहीण शैलेश, मेहुणी रितू, बहीण सीमा, आई फुलवती, जनकराज आणि अक्षय यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

दगडफेक आणि गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव नीरज शर्मा उर्फ ​​टिल्लू पंडित असे आहे. तेव्हापासून पोलीस टिल्लूचा शोध घेत होते. ही घटना घडल्यानंतर तो गोव्यात मैत्रिणीसोबत राहत होता आणि त्याने आपला मोबाईल बंद केला होता.

पोलीस त्याचा शोध घेत होते आणि पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले असता टिल्लू पणजीत असल्याची खात्री झाली. मेरठ पोलिसांचे पथक गोव्यात दाखल होत त्यांनी टिल्लू पंडितला अटक केली.

मेरठमध्ये गुन्हा करून दूर-दूरच्या राज्यांमध्ये पळून जाणे अशी टिल्लू पंडितची मोडस ऑपरेन्डी होती. यापूर्वी तो दुचाकी चोरी करुन कर्नाटकात फरार झाला होता.

प्रकरण खूप गंभीर असल्याची माहिती मेरठचे एसपी आयुष विक्रम सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. नीरज शर्मा उर्फ ​​टिल्लू पंडित यांच्यावर 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मिरिंडा आणि जॉन अद्याप फरार असून त्यांचाही शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT