Maharashtra-Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Maharashtra-Goa Crime: गोव्यात वास्तव्य, महाराष्ट्रात चोरी! 21 वर्षांचा अट्टल गुन्हेगार असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra-Goa Crime News: महाराष्ट्रातील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील वाँटेड आरोपी गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महाराष्ट्र आणि गोवा पोलीसांच्या संयुक्त तपासानंतर साळगाव पोलिसांनी काल रात्री गुन्हे शाखा, युनिट 2, वसई, महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बार्देशमधील माँटे व्हिला, सांगोल्डामधून संबंधित चोरट्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या देखरेखीखाली पीएसआय आतिकेश खेडेकर, वैभव आरोंदेकर, कॉनस्टेबल तुळशीदास गवस यांचा समावेश असलेल्या साळगाव पोलिसांच्या पथकाने एपीआय सुहास कांबळे, एएसआय संजय नवले, एचसी सुधीर नरळे, पी.सी. अमोल कोरे यांच्या नेतृत्वाखाली वसईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपीला अटक केली आहे.

संबंधित आरोपीचे नाव रोहित चेतन शेट्टी (वय 21 वर्ष) असून तो सध्या काणकामध्ये राहतो. तो मूळचा महाराष्ट्रचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तो ठाणे माणिकपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील दिवसाढवळ्या एक घर फोडून चोरी केल्याच्या प्रकरणात सहभागी होता. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा क्रमांक 126/2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. दरम्यान, साळगाव पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT