Attempt To Murder Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Case: शेजाऱ्यानेच केला घात, सत्तरीत साडेचार वर्षीय मुलीच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Attempt To Murder In Sattari Goa

सत्तरी तालुक्यातील मोर्ले येथे अनन्या अनिल लमाणी या साडेचार वर्षांच्या मुलीचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज (मंगळवारी, दि.13) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ माजली.

या मुलीच्या घराशेजारीच राहणाऱ्या युवकाने काल सायंकाळी त्या मुलीचे आई-वडील घरी नसताना तिच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर मुलीला गायब केले. मात्र ती मुलगी आज सकाळी पोलिसांना जखमी अवस्थेत जवळच्या डोंगरावर एका काजूच्या झाडाखाली आढळली.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून सदू ठाकूर याला अटक केली आहे. मोर्लेतील चिरेखाणीवर काम करणारे परप्रांतीय मजूर राहत असलेल्या वस्तीतील एक चार वर्षीय मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता होती.

डोंगरमाथ्यावर रात्रभर पडली होती तळमळत

संशयिताने दिलेल्या माहितीप्रमाणे काल रात्री 8 ते उत्तररात्री 3 वाजेपर्यंत पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. पण तिचा थांगपत्ता लागला नाही. संशयित पोलिसांची दिशाभूल करत होता.

3 वाजता पोलिसांनी शोधमोहीम थांबवली आणि संशयिताला पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारून टाकल्याचे सांगितले.

पोलिसांनी पुन्हा त्याला घटनास्थळावर नेऊन शोध घेतला. तो सुरू असताना मुलगी डोंगरमाथ्यावरील एका काजूच्या झाडाखाली तळमळत असल्याचे दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT