Ponda-Sanquelim Municipal Election  Dainik Gomantak
गोवा

Ponda-Sanquelim Municipal Election 2023: साखळी-फोंडा नगरपालिकांच्या 23 प्रभागांसाठी आज मतदान

74 उमेदवार रिंगणात; अनेक जागी तिरंगी लढती

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda-Sanquelim Municipal Election 2023: राज्यात प्रतिष्ठेच्या बनलेल्या साखळी आणि फोंडा पालिकांसाठी आज शुक्रवारी मतदान होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

निवडणूक आयोगाने साखळीत 10 तर फोंड्यात 22 मतदान केंद्रे उभारली असून आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांचा आज ताबा घेतला.

सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव यांनी दिली.

शुक्रवारी मतदान होत असल्याने आणि अनेक प्रभागांत अत्यंत चुरस निर्माण झाल्याने मतदारांना पैसे वाटणे, आमिष दाखवणे, धमकावणे, मतदारांची पळवापळवी करणे यासारख्या घटना घडू नयेत, यासाठी आयोगाकडून निवडणूक अधिकारी, निरीक्षक आणि पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे. शिवाय उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांनीही पाळत ठेवली आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून या मतदान केंद्रांवरील प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. शेवटचा एक तास कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांकरता राखीव ठेवण्यात आला आहे. १० प्रभागांसाठी ६ हजार ९३२ मतदार असून यापैकी ३ हजार ३९१ पुरुष तर ३ हजार ५४१ महिला मतदार आहेत.

फोंडयात कृषिमंत्री रवी नाईक तर काँग्रेसकडून राजेश वेरेकर यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती. साखळीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रचार केला होता.

8 मे रोजी निकाल

निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे या दोन्ही पालिकांची मतमोजणी 7 मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून साखळीत ती बहुउद्देशीय सभागृहात होईल, तर फोंडा पालिकेची मतमोजणी गव्हर्मेंट कॉम्प्लेक्स तिस्क-फोंडा येथे होईल.

पोलिस दलाकडून मोठा फौजफाटा

साखळीची निवडणूक खूपच चुरशीची बनल्याने ती शांततेत आणि निर्भयपणे पार पडावी, याकरता पोलिस दलाच्या वतीने उपअधीक्षक आणि निरीक्षकांच्या देखरेखीखाली मोठा फौजफाटा तैनात केला आहे. हीच परिस्थिती फोंडा येथेही आहे.

निवडणूक आयोगानेही साखळीत निवडणूक अधिकारी म्हणून डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर आणि फोंड्यात उपजिल्हाधिकारी रघुराज फळदेसाई यांच्या निरीक्षणाखाली विविध निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: गोवा विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

SCROLL FOR NEXT