Goa Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मतदारांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद...

घरोघरी प्रचार: हरवळेला स्वतंत्र पंचायत भाजपमुळेच

दैनिक गोमन्तक

साखळी: हरवळे गावाला स्वतंत्र पंचायतीचा दर्जा भाजप सरकारनेच दिला व या ग्रामीण दुर्गम भागाला साखळी पालिका क्षेत्रातून मुक्त केले. म्हणूनच हरवळे पंचायत क्षेत्रातील लोक सदैव भाजपच्याच पाठिशी असतात, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

हरवळे परिसरात घरोघरी प्रचार केल्‍यानंतर मुख्‍यमंत्री बोलत होते. त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्‍यान मुख्यमंत्र्यांनी काही ज्‍येष्‍ठ मतदारांची भेट घेऊन सरकारच्या विविध योजनांची चौकशी केली. हरवळेला स्वतंत्र पंचायत इमारत आपण आपल्या आमदारकीच्या कारकीर्दीत मिळवून दिली. या गावातील अनेक समस्या भाजप सरकारने सोडविल्या आहेत. तसेच लोकांना अनेक योजनांचा लाभही मिळवून दिला आहे. (Voters' spontaneous response to Goa Chief Minister Pramod Sawant)

म्हणूनच हरवळेत भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आपण या गावातून प्रचंड आघाडी घेऊ, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी व्यक्त केला. प्रचारावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

भाजपने (Goa BJP) सर्वसामान्यांपर्यंत कल्याणकारी योजना पोहचवून प्रत्येकाला आधार दिला आहे. त्यामुळे भाजपला यावेळीही जनता नक्कीच साथ देईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

काॅंग्रेसने धुडकावली होती मागणी

हरवळे या ग्रामीण भागाला साखळी पालिकेतून बाजूला करून वेगळी पंचायत करण्‍याची मागणी काँग्रेसने (Goa Congress) धुडकावली होती. ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2012 सालच्‍या निवडणुकीत दिले व पूर्णही केले. आज हरवळे विकासाच्या मार्गावर आहे, असे मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले. हरवळेतील जनता प्रामाणिक असून, यावेळीही भाजपच्या बाजूने राहणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT