Canacona Accident Dainik Gomantak
गोवा

Canacona Accident: व्होल्वो बसची दुचाकीला जोरदार धडक; चापोलीतील पती-पत्नीचा दुर्दैवी अंत...

महिलेच्या अंगावरून गेले बसचे चाक

Akshay Nirmale

Canacona Accident: दक्षिण गोव्यात काणकोण तालुक्यातील गुळे येथे एक भीषण अपघात घडला आहे. व्होल्वो बसने दुचाकीला ठोकरल्याने या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा करूण अंत झाला आहे. आज, मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला.

हे दाम्पत्य चापोली येथील आहे. मंगळवारी सकाळी ते दुचाकीवरून चावडी येथे जात होते. यावेळी मडगाव-कारवार रस्त्यावर गुळे येथे या आंतरराज्य प्रवासी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. व्होल्वो बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेली महिला गाडीवरून खाली पडली.

बसचे चाक तिच्या अंगावरून गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या पतीला गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याला काणकोण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्याचेही निधन झाले. ही इंटरसिटी बस मडगावच्या दिशेने जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT