गोव्यात दरवर्षी आयोजित होणारा विवा कार्निव्हल महोत्सवाचे अनावरण (कर्टन रेजर) आज (शुक्रवारी) पर्वरीत पार पडले. यावेळी राज्याचे पर्यटनंत्री रोहन खंवटे, डिचोलीचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये, मांद्रेचे आमदार जित आरोलकर, साळगावचे आमदार केदार नाईक हजर होते.
यंदाच्या बहुचर्चित कार्निव्हल महोत्सवासाठी किंग मोमो म्हणून क्लाईव्ह अँथनी ग्रासियस (Clive Anthony Gracias) यांची निवड झाली आहे. यावेळी किंग मोमो उपस्थित होता.
प्रत्यक्षात कार्निव्हल सुरु होण्यापूर्वी दरवर्षी पर्वरीत कर्टन रेजर कार्यक्रम पार पडत असतो. पर्वरीत कार्निव्हलची परेड पार पडली.
10 ते 13 फेब्रुवारी रोजी पणजीतील कार्निव्हल फ्लोट पाटोपासून कला अकादमीकडे जातील.
मडगावमध्ये 11 फेब्रुवारीला कार्निव्हलचे फ्लोट मार्च करतील. मडगावातील होली स्पिरीट चर्च ते पालिका इमारत चौक या पारंपरिक मार्गावरुन कार्निव्हल मिरवणूक होईल.
तर, वास्कोत 12 फेब्रुवारीला आणि 13 फेब्रुवारी रोजी म्हापसात कार्निव्हलचे फ्लोट मार्च करतील अशी माहिती पर्यटन खात्याने दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.