Phillippines Coast Guard Goa Visit:  Dainik Gomantak
गोवा

Phillippines Coast Guard Goa Visit: फिलिपाइन्सच्या तटरक्षक दलाच्या शिष्टमंडळाची गोव्याला भेट

गस्तीवरील नौकांसह विविध कामांचा पाहणी, द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा

गोमंतक ऑनलाईन टीम

Phillippines Coast Guard Goa Visit: फिलीपाईन्स कोस्ट गार्ड (PCG) च्या शिष्टमंडळाने गोव्यात भारतीय तटरक्षक दला (ICG) ला भेट दिली. फिलिपाईन्सचे कमांडंट अॅडमिरल आर्टेमियो मनालो अबू यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने ही भेट घेतली. द्विपक्षीय बैठकीत विविध विभागातील सहकार्याविषयी चर्चा झाली.

या भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने मुख्यालयास भेट दिली. तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचीही भेट घेतली. तसेच गस्त घालणाऱ्या नौकांसह इतर नौकांचीही पाहणी केली.

या शिष्टमंडळाला भारतीय जहाजबांधणी आणि एरोस्पेस उद्योग क्षमतेची झलक दाखवण्यात आली. यात ज्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे बनवण्यात आलेल्या ALH MK3 हेलिकॉप्टरच्या ग्राहक प्रात्यक्षिक उड्डाणाचाही (CDF) समावेष होता.

ALH MK3 हे एक मल्टीपर्पज हेलिकॉप्टर आहे. रिसर्च अँड सेफ्टी तसेच पाणबुडीविरोधी युद्ध आणि सागरी पाळत ठेवण्यासह विविध मोहिमा पार पाडण्यात हे हेलिकॉप्टर सक्षम आहे.

शिष्टमंडळाने गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) लादेखील भेट दिली. जी भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपन्यांपैकी एक आहे. GSL सध्या भारतीय तटरक्षक दल आणि नौदलासाठी अनेक जहाजे तयार करत आहे.

PCG आपली सागरी क्षमता सुधारण्यासाठी नवीन मालमत्ता आणि तंत्रज्ञान मिळवण्याचाही विचार करत आहे.

ही भेट भारतासोबतच्या फिलीपाईन्सच्या सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून दोन्ही देशांचे सागरी संबंध अधिक दृढ होतील आणि द्विपक्षीय संबंधात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकून प्रादेशिक सहकार्याला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT