Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

मला खाते केंद्रातील नेत्यांनी दिले, आपण काहीही बेकायदेशीर करत नाही; विश्‍‍वजीत राणे यांचा निर्वाळा

Vishwajit Rane: उठसूट टीका करणाऱ्या विरोधकांचा आज नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: डोंगरकापणी, भूरुपांतरणावरून उठसूट टीका करणाऱ्या विरोधकांचा आज नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. त्‍यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना हे खाते आपल्याला केंद्रातील नेत्यांनी दिल्याचे नमूद करून आपण काहीही बेकायदेशीर करत नसल्याचा निर्वाळा दिला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी भूतानी प्रकल्पाविरोधात कारवाई करण्याचे आव्हान दिल्यावर राणे यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित करणारे बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्हिएगश यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना कारवाईविषयी आश्‍वस्त केले. महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जाण्यापूर्वी आज मिरामार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. याप्रसंगी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राजेश बोरकर उपस्थित होते.

डोंगरकापणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तलाठी आणि मामलेदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता त्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे, असेही राणे यांनी यावेळी नमूद केले.

‘मंगलम’ इमारत रोखली, ‘भूतानी’ रोखायला किती वेळ लागेल?

भूतानी प्रकल्पाविषयी राणे म्हणाले, इतर कोणासही याबाबत लेखी निवेदन देण्यास मी सांगितले होते. शिवाय आमदार आंतोन वाझ यांनाही आपण याविषयी सूचित केले होते. लेखी तक्रार आल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्‍‍वासन दिले होते. परंतु आजपर्यंत कोणीही लेखी तक्रार दिलेली नाही, असे राणे म्‍हणाले. ‘मंगलम’सारखी मोठी इमारत जर आपण थांबवू शकलो तर ही ‘भूतानी’ थांबवायला किती वेळ लागेल?

जी-सुडाचे ऑडिट गरजेचे

गोवा राज्य नागरी विकास प्राधिकरणाच्‍या (जी-सुडा) एक ऑफिसर देसाईला आपण निलंबित केले आहे. तेथील अंदाधुंद कारभाराची चौकशी आणि ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मी मंत्री होण्यापूर्वी त्या सर्व कामांची निविदा काढली गेली. त्‍याची चौकशी व्‍हावी. महालेखापालांकडून ऑडिट करण्याची आपली तयारी आहे, असे राणे म्‍हणाले.

दक्षिण गोवा रुग्णालय परिपूर्ण बनवणार

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आवश्‍यक डॉक्टर व इतर कर्मचारी घेण्याबरोबरच इतर सुविधाही देण्यावर आरोग्य खात्याने भर दिला आहे. हे केवळ जिल्हा रुग्णालय राहू शकत नाही, ते गोव्यातील परिपूर्ण सेवा देणारे रुग्णालय म्हणून घोषित करावे लागेल. या रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, असे स्‍पष्‍टपणे आरोग्‍यमंत्री राणे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश

गोमेकॉमध्ये १४० आयसीयू खाटा काही दिवसांत उपलब्ध केल्या जातील.

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात पदे भरण्याचे काम झाले आहे आणि ही पदे डॉक्टरांच्या माध्यमांतून भरली जात आहेत.

उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातही आयसीयू कक्ष उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथे अत्‍याधुनिक सुविधा असतील.

इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागाचे रेडिओलॉजिस्ट डॉ. पवन यांनी राजीनामा दिला होता, परंतु त्यांना विनंती करून पुन्हा गोमेकॉच्या सेवेत रुजू केले आहे.

डॉ. सनथ भाटकर यांनी शंभरच्यावर कॉयलिंगच्या केसेस गोव्यात मोफत केलेल्या आहेत.

१०८ रुग्णवाहिका विलंबाने येत असेल, तर लोकांनी त्याविषयी तक्रार करावी, ४ किंवा ५ सप्टेंबर रोजी १०८ च्या ऑडिटविषयी बैठक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT