Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

बेकायदेशीर कृत्यांविरोधात कारवाई होणारच; राणेंनी ठणकावलं

तक्रारींबाबत दुभाजाव नाही; नगरनियोजनमंत्री विश्‍वजित राणे यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : कायद्याचे उल्लंघन करून ज्यांनी बेकायदेशीर कृत्ये केली आहेत तसेच तक्रारी येतील त्याची शहानिशा करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कोणताच दुभाजाव न करता कारवाई होणार आहे. गोव्याचे संरक्षण व संस्कृती, वारसा याचा बचाव करायचे असल्यास योग्यवेळी ही कारवाई होणे गरजेचे आहे. गोवा हे छोटे राज्य आहे त्यामुळे ज्या बेकायदेशीर गोष्टी होतील त्यावर कारवाई केली जाईल असे नगरनियोजन मंत्री विश्‍वजित राणे यांनी ठणकावून सांगितले आहे.

काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी येथील बेकायदा डोंगरकापणीची तक्रार दाखल केली आहे त्याची त्वरित दखल घेऊन मुख्य नगर नियोजकांनी त्याची शहानिशा करून त्यात उल्लंघन झाले असल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ज्या काही भागात बेकायदेशीर गोष्टी सुरू आहेत त्यावर सरकारचे तसेच खात्याचे लक्ष आहे. खात्याच्या कार्यपद्धतीबाबत आणि सरकारबाबत मला कोणी सल्ला देण्याची गरज नाही. जेथे कायद्याचे उल्लंघन झाले आहे, मग ते खाते किंवा राजकारणी असो त्याच्याविरुद्ध कारवाई ही केली जाणारच असे राणे ठामपणे म्हणाले.

बेकायदा गोष्टींवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्यानंतर राजकारणात बालिश वक्तव्ये केली जात आहेत मात्र त्याच्याकडे मी लश्र देत नाही. जनतेचा विकास तसेच कोठे लक्ष द्यावे हे इतरांनी सांगायची गरज नाही. जनतेची सेवा करण्यासाठीच मी राजकारणात आलो आहे, असेही विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं.

कोविड काळात आरोग्यमंत्री असताना सरकारवर तसेच खात्यावर बऱ्याच टीका झाल्या मात्र ज्या सकारात्मक होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले.
ज्यांनी बेकायदेशीर गोष्टी केल्या आहेत तसेच कायद्याचे उल्लंघन केले आहे याची माहिती आगामी पावसाळी अधिवेशनात सभागृहात दिली जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल. जे काही होईल ते कायदेशीरच होईल. कोणताही दुभाजाव न करता ही कारवाई होणार आहे. भाजप ही एक संघटना आहे व मी त्याचा सदस्य आहे त्यामुळे सदस्यांना नियम व कशाप्रकारे कार्य करायचे हे माहीत असते त्यासाठी लोकांची सेवा करताना इतरांची कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. माझे नाव घेऊन बालिश वक्तव्याने टीका करतात त्यांनाही प्रसिद्धी मिळते असा टोमणा त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांवर हाणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT