Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : जिल्हा इस्पितळांकडून डेंग्यूची प्रकरणे हाताळणे अपेक्षित

मुख्यमंत्री तसेच विभाग प्रमुखांसह बैठक घेणार असल्याची आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य खात्याकडून आवश्यक ती पावले उचलली जातील. परंतु, डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांचा उपचार जिल्हा इस्पितळ पातळीवर होणे अपेक्षित आहे. कारण गोमेकॉवर ताण कमी करण्यासाठी हे आवश्‍यक आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विभाग प्रमुखांच्या सोबत बैठक घेणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत दिली.

आमदार क्रूझ सिल्वा यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. गोमेकॉवर ताण कमी करण्याच्या उद्देशाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये इस्पितळ सुरू करण्यात आली होती. आता इस्पितळात गेलेल्या प्रत्येक रुग्णाला जर गोमेकॉत पाठवले जाईल, तर हा उद्देश विफल होणार आहे. त्यासाठी बैठक घेऊन या पुढे उपचार करण्याचे आदेश देणार आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले.

सांत जुझे दी आरियल येथील मडगाव औद्योगिक वसाहतीत डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडून सहकार केला जात असून, परिसर स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. खात्याकडून आवश्‍यक पाऊल घेतले जाईल, असे राणे यांनी सांगितले.

क्रूझ सिल्वा यांनी सांत जुझे दी आरियल येथे असलेल्या मडगाव औद्योगिक वसाहतीत डेंग्यूचा संसर्गबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती. सिल्वा यांनी डेंग्यूच संशयित रुग्णाला दक्षिण गोवा इस्पितळातून योग्य उपचार न करताच गोमेकॉमध्ये पाठवण्याचा प्रकार मंत्र्यांच्या नजरेस आणून दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT