Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Sattari: सत्तरीला विकासाचे ‘मॉडेल’ बनवू! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; ZP पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक

Vishwajit Rane : वाळपई भाजप कार्यालयात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तरीतील पंच, सरपंच, बूथ कमिटी सदस्य आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: वाळपई भाजप कार्यालयात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तरीतील पंच, सरपंच, बूथ कमिटी सदस्य आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजयाची रूपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक अत्यंत फलदायी ठरली.

बैठकीत मार्गदर्शन करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, आज सत्तरीतील पंच सदस्य आणि बूथ कार्यकर्त्यांसमवेत अर्थपूर्ण सकाळ व्यतीत केली. मी स्वतः एक अभिमानी भाजप कार्यकर्ता असून, आपल्या देशाचे पथदर्शक नेते, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या परिवर्तनशील दूरदृष्टीने आम्ही सतत प्रेरित आहोत. केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या महत्वाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे ही आमची प्राथमिकता आहे.

ते पुढे म्हणाले, सत्तरीला ‘विकसित गोवा’चे मॉडेल बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तरुण आणि महिलांचे सक्षमीकरण, कल्याणावरून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, आणि नवीन रोजगार संधी उभारणे हेच आमचे ध्येय आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयत्न या तत्त्वांनुसार आम्ही दृढ निश्चयाने पुढे चाललो आहोत.

सत्तरीचा विकास भाजपमुळे झाला असुन भाजपच्या उमेदवारांना भरघोष मतांनी निवडणुक आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. बैठकीस विनोद शिंदे, सगुण वाडकर, देवयानी गावस, राजश्री काळे, उमाकांत गावडे, वाळपई आणि पर्ये मतदार संघातील सर्व सरपंच, पंच, बूथ कमिटी सदस्य आणि सत्तरी तालुक्यातील सर्व मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.

चार उमेदवार घोषित

सत्तरी तालुक्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांचे भाजपचे अधिकृत उमेदवार असे ः होंडा- नामदेव बाबल च्यारी, केरी- नीलेश शंभा परवार, नगरगाव-प्रेमनाथ गणेश दळवी, गांजे-समीक्षा वामन नाईक यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

माणुसकीला काळिमा! गाईच्या पोटातून निघाला 48 किलो प्लास्टिकचा डोंगर; वाळपईत 'रेकॉर्ड ब्रेक' शस्त्रक्रिया

Viral Video: 'मी नाही तर कोणीच नाही!' बॅटिंग मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं अख्खं क्रिकेट ग्राऊंडच नांगरलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT