Goa Health Minister Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

विश्वजित राणे गोव्याचे मुख्यमंत्री होण्यास उत्सुक

अंतिम निर्णय हा पक्ष नेतृत्वच घेईल.

दैनिक गोमन्तक

पर्वरी: पर्वरीच्या आमदार दिव्या राणे यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचे पती, वाळपईचे आमदार विश्वजित राणे यांना 15 वर्षांचा राजकीय अनुभव असल्याने ते मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहेत, परंतु अंतिम निर्णय हा पक्ष नेतृत्व घेईल. (Vishwajit Rane is eager to become the Chief Minister of Goa)

दरम्यान त्यांना पक्षातील असंतोषाबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, “मला असहमतीबद्दल माहिती नाही, पक्षाचा उच्चाधिकार निर्णय घेईल” असे त्या म्हणाल्या.

विश्वजित हे मुख्यमंत्री (CM Candidate) पदासाठी विचारात आहेत का असा प्रश्न त्यांना केला असता, त्या म्हणाल्या, “नक्कीच. मला वाटते की निवडून आलेला कोणताही प्रतिनिधी तयार असेल आणि ते गेल्या 15 वर्षांतील अत्यंत अनुभवी राजकारणी आहेत, परंतु अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. भाजपमध्ये सावंत (Parmod Sawant) आणि विश्वजित (Vishwajeet Rane) अशी कोणतीही गटबाजी नाही, हे सर्व मीडियाने तयार केले असल्याचे त्या म्हणाल्या. "मी कशासाठीही दावा करत नाही. जर पक्षाला वाटत असेल की मी मंत्रिमंडळात येण्यास योग्य आहे, तर त्याचा निर्णय अंतिम आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

राणे दाम्पत्याने काँग्रेसचा दारुण पराभव केला

सत्तरी तालुक्यात राणे दाम्पत्याने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे. वाळपई मतदारसंघात विश्वजीत राणेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे, तर पर्ये मतदारसंघातून विश्वजीत राणेंच्या पत्नी दिव्या राणे यांनी आमदारकी मिळवली आहे. दोन्ही मतदारसंघात अगदी सहजपणे भाजपला (Goa BJP) विजय मिळाला आहे. विश्वजीत राणेंना यावेळी रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांनी कडवी टक्कर दिली आहे. मात्र अटीतटीच्या लढतीत विश्वजीत यांनी मनोज परब यांचा पराभव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT