Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

'येत्या 6 महिन्यांत वाघेरी वन्यजीव संवेदनशील परिसर बनवणार'

विश्वजीत राणेंचे संकेत; गोव्यातील व्याघ्र प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात वाघेरीसारखे अनेक परिसर आहेत, जे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर होणे गरजेचे आहे. यासाठी येत्या सहा महिन्यांत केंद्र सरकारच्या मदतीने वाघेरी वन्यजीव संवेदनशील परिसर म्हणून जाहीर करणार असल्याची माहिती वनमंत्री राणे यांनी दिली. गोमन्तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याविषयी संकेत दिले आहेत.

वाघेरी हे खासगी जंगल (प्रायव्हेट फॉरेस्ट) आहे. शिवाय हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा बनला आहे. हा परिसर संरक्षित झाल्यास याचा उपयोग काही लोकांच्या स्वार्थासाठी करता येणार नाही. सध्या यातील काही भाग संबंधित मालकाने राज्याबाहेरील लोकांना विकला आहे. मात्र, हे सगळे व्यवहार बेकायदेशीर असून त्यांच्यावर वृक्ष संवर्धन कायदा 1984 आणि नगर नियोजन खात्याच्या कलम 17 ब नुसार ती कारवाई होईलच, असंही विश्वजीत राणेंनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील म्हादई अभयारण्य आणि अन्य जंगल मिळून व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर होण्यास आपला विरोध असल्याचे सांगत मंत्री राणे म्हणाले की, पर्यावरणीयदृष्ट्या वाघ महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच स्थानिक लोकांचे हितसंबंध आणि कल्याण महत्त्वाचे आहे. याकरिता जंगल आणि माणूस यांच्या सहजीवनाला महत्त्व दिले पाहिजे. या परिसराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची आवश्यकता नाही. सध्या हा परिसर विविध अभयारण्यांनी व्यापलेला आहे. यापुढेही त्याच पद्धतीने त्याचे संवर्धन आणि संरक्षण केले जाईल. व्याघ्र प्रकल्पासाठी मोठ्या बफर आणि कोअर झोनची आवश्यकता असते. गोवा हे अत्यंत लहान राज्य असले तरी 60 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रीन कव्हर असलेले पहिले राज्य आहे, असेही विश्वजीत राणे पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT