vip constituency election results 2022 winners in vip seats of up punjab uttarakhand goa and manipur | Assembly Election Results 2022 live updates Dainik Gomantak
गोवा

AAP ठरणार मोठा पक्ष व्हीआयपी जागांवर कोण पुढे, कोण मागे?

पाहा पाच राज्यांतील महत्त्वाच्या जागांचे निकाल

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतचा ट्रेंड पाहिल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल योग्य असल्याचे दिसून येत आहे. हा अगदी सुरुवातीचा ट्रेंड आहे आणि मोजणीच्या अजून खूप फेऱ्या बाकी आहेत. ट्रेंडनुसार भाजपने यूपी आणि उत्तराखंडमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. गोवा (goa) आणि मणिपूरमध्येही (Manipur) भाजप बहुमताच्या जादूई आकड्याच्या आसपास असल्याचे दिसते. (Assembly Election Results 2022 live updates)

व्हीआयपी जागांवर कोण पुढे आणि कोण मागे?

ताजी माहिती मिळेपर्यंत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यूपीमधील करहल विधानसभा (Assembly) मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार एसपी सिंह बघेल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या जागेवर बसपचे कुलदीप नारायण तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (AAP Latest News Updates)

ताज्या माहितीनुसार, पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे भदोर आणि चमकौर साहिब या दोन्ही विधानसभा जागांच्या मतमोजणीत पिछाडीवर आहेत. हा एक अतिशय प्रारंभिक कल आहे. भदौरमध्ये आम आदमी पक्षाचे लाभ सिंह आणि चमकौर साहिबमध्ये याच पक्षाचे चरणजीत सिंह असल्याची माहिती आहे. पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू आहे.

पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, आम आदमी पार्टी देखील सकाळी 9.30 वाजता 64 जागांवर 50 टक्के मते मिळवणारा मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत आम आदमी पक्ष पंजाबमध्ये एक मोठा पक्ष म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आहे.

निवडणूक आयोगाने रात्री 9.30 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, ट्रेंडमध्ये, AAP पक्षाला एकूण 42.87 टक्के मते मिळाली असून 64 जागांवर आघाडीवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

SCROLL FOR NEXT