Galjibagh jetty

 

Dainik gomantak

गोवा

गालजीबाग जेटीच्‍या निकृष्‍ट बांधकामाला ग्रामस्‍थांचा आक्षेप

नियोजनाचा अभाव : साबांखा, कंत्राटदाराची मनमानी रोखण्‍याची मागणी

दैनिक गोमन्तक

काणकोण : गालजीबाग नदी किनाऱ्यावर उभारण्यात येत असलेल्या जेटीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते व मनोहर पर्रीकर बगल मार्गाचे कंत्राटदार यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

गालजीबाग (Galjibagh) नदीवर पूल उभारल्यानंतर माशे आणि गालजीबाग या दोन्ही किनाऱ्यांवरील होडी धक्के मोडून काढण्यात आले. पूल उभारण्यापूर्वी नदी पात्र ओलांडण्यासाठी होडी सेवा होती. ती सेवा लोलये व पैंगीण पंचायतीच्या (panchayat) संयुक्त विद्यमाने करण्यात येत होती. त्यानंतर नदी परिवहन खात्यातर्फे मोटार बोट सुरू केली आहे.

माशेच्या बाजूने कंत्राटदाराने व्यवस्थित जेटी बांधून सुशोभीकरण केले. मात्र, गालजीबागच्या बाजूने करण्यात येत असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे येथील सेबी बार्रेटो यांनी सांगितले. या जेटीचे काम व्यवस्थित करणे गरजेचे आहे. कारण, गालजीबाग नदीतील मासेमारी बोटी या जेटीवर नांगरण्यात येतात, असे गेली अनेक वर्षे गालजीबाग नदी पार करण्यासाठी होडी सेवा देणाऱ्या प्रकाश नाईक यांनी सांगितले.

सभापतींच्‍या निर्देशांकडेही दुर्लक्ष

या जेटीची बांधणी करून सुशोभीकरण करण्याची मागणी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, पूल उभारणीच्या खर्चात त्याचा समावेश नसल्याने हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करणे शक्य नसल्याने उपसभापतींनी कंत्राटदारांकडून करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कंत्राटदाराने हे काम निकृष्ट दर्जाचे करून येथील रहिवाशांची थट्टा केल्‍याचे म्‍हणणे त्‍यांचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

SCROLL FOR NEXT