खारीवाडा येथे घरांच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची ग्रामस्थांकडून हकालपट्टी
खारीवाडा येथे घरांच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची ग्रामस्थांकडून हकालपट्टी Dainik Gomantak
गोवा

खारीवाडा येथे घरांच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची ग्रामस्थांकडून हकालपट्टी

दैनिक गोमन्तक

मुरगाव बंदर प्राधिकरण आणि गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथोरिटीने खारीवाडा येथे घरांची संयुक्त पाहणी (सर्व्हे) करण्यासाठी आले असता येथील रहिवाशांनी सदर अधिकारी वर्गांला हाकलून लावले. मुरगाव बंदर प्राधिकरण आणि गोवा सरकार (Goa Government) कोळसा साठवण्यासाठी खारीवाडा येथील घरे उद्ध्वस्त करण्यासाठी अदानीशी संगनमत करत असल्याचा आरोप यावेळी येथील रहिवाशांनी केला.

16 मार्च 2022 रोजी मुरगाव नगरपालिकेच्या (Mormugao Municipality) अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन खारीवाडा येथील 18 घरांचा बेकायदेशीर बांधकामाचा विस्तारित भाग पाडण्यात आला होता. मुरगाव पोर्ट ट्रस्टने खारीवाडा येथील बेकायदेशीर बांधकामांबाबत उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

नंतर 363 इतर बेकायदेशीर बांधकाम पैकी सुमारे 18 कुटुंबांनी त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रासह न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान मुरगाव नगरपालिकेने सर्वेक्षण योजनेचा भाग नसल्याने खारीवाडा येथील 18 पैकी 12 बेकायदा विस्तारित घरांचा भाग जमीनदोस्त केला होता. यावेळी स्थानिक आणि तीव्र निषेध नोंदवला आणि मध्यंतरी ही कारवाई करण्यास भाग पाडले. राजकीय नेत्यांसह संतप्त रहिवाशांनी नंतर मुरगाव नगरपालिकेवर मोर्चा काढला आणि ती घरे पाडण्याबाबत खुलासा मागितला. पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले व त्या 18 घरांचा बेकायदेशीर विस्तारित भाग पोलीस बंदोबस्त्तात पाडण्यात आला.

दरम्यान आज दुपारी 11च्या दरम्यान बंदर प्राधिकरण आणि गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी संयुक्त पाहणी करताना येथील रहिवासी भांबावून गेले. खारीवाडा येथील रहिवाश्यांना विश्वासात न घेता ही पाहणी चालली होती. त्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना जाब विचारला असता ते निरुत्तर झाले आणि त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून तेथून हुसकावून लावण्यात आले. यावेळी तिथे काँग्रेसचे नेते विरीयातो फर्नांडिस खारीवाडा येथील रहिवाशांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी त्या अधिकाऱ्यांना कायद्याविषयी माहिती देऊन त्यांच्याकडून खुलासा मागितला असता ते उत्तर देऊ शकले नाही. येथील रहिवाश्यांचे आक्रमक रूप पाहून त्या अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

यावेळी बोलताना विरीयातो फर्नांडीस म्हणाले की खारीवाडा येथील लोकांच्या घरावर बुलडोझर चढवून सरकारने येथे कोळसा हब करण्याचा घाट रचला आहे. यापूर्वी 2016 रोजी एमपीटीने ड्रेजिंग करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र खारीवाडा येथील लोकांनी पुणे येथे एनजीटी मध्ये धाव घेऊन हे ड्रेजिंगचे काम बंद पाडले. अन्यथा खारीवाडा येथील घरे महापुरात उध्वस्त होणार होती. नोव्हेंबर 2019 मध्ये कोस्टल झोन मॅनेजमेंट ड्राफ्ट तयार केला होता. खारीवाडा हा फिशिंग व्हिलेज म्हणून पालिकेतील 25 नगरसेवकांनी मान्यता देऊन ठराव संमत केला होता. हे सर्व असताना एमपीए या भागात धुसफूस का करते हा मोठा प्रश्न आहे असे सांगताना सगळ्या गोवेकरांनी संघटीत राहून एमपीएचा व सरकारचा कोळसा हब करण्याचा घाट हाणून पाडावा असे आवाहन विरीयातो यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart City : जेव्हा राजधानी पणजी शहराचे वय शोधले जाते...

Pernem Accident : धारगळमधील ‘तो’ अपघात की खून? तरुणाचा मृत्यू

Water Scarcity : पाणी टंचाईबाबत बेतोडावासीय आक्रमक; अधिकाऱ्यांना विचारला जाब

OCI Card Issue : ‘ओसीआय’प्रकरणी जनतेची फसवणूक : आमदार कार्लुस फेरेरा

Fire Brigade : अग्निशमनचे ‘मल्टिटास्क युनिट’; रायकर यांची माहिती

SCROLL FOR NEXT