Benaulim Beach Parking Issue Dainik Gomantak
गोवा

Benaulim: 'पार्किंग' जागेवरुन बाणावलीत भरली खास ग्रामसभा! 'खासगी' कंपनीला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

Benaulim Beach Parking Issue: बाणावली समुद्र किनाऱ्याजवळ असलेली पार्किंग जागा खासगी कंपनीला देण्यास आज खास ग्रामसभेने विरोध केला. रात्री उशिरापर्यंत ही ग्रामसभा सुरू होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim Beach Parking Issue

मडगाव: बाणावली समुद्र किनाऱ्याजवळ असलेली पार्किंग जागा खासगी कंपनीला देण्यास आज खास ग्रामसभेने विरोध केला. रात्री उशिरापर्यंत ही ग्रामसभा सुरू होती.

बाणावली समुद्र किनाऱ्यावर असलेली पार्किंग जागा पर्यटन खाते खासगी कंपनीला देणार, अशी बातमी पसरल्याने येथील ग्रामस्थांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. त्यामुळे आज खास ग्रामसभा बोलावण्यात आली होती.

पर्यटन खात्याकडून बाणावली पंचायतीला कुठलाही अधिकृत प्रस्ताव अजूनपर्यंत आलेला नाही, असा खुलासा पंचायतीतर्फे करण्यात आला. यावेळी बोलताना बाणावलीच्या उपसरपंच ग्लिडा फर्नांडिस यांनी ही पार्किंग जागा पर्यटन खाते ६० वर्षांच्या भाडेपट्टीवर खासगी कंपनीला देणार, अशी कल्पना स्थानिकांना असल्याने त्यांच्यात घबराटीचे वातावरण तयार झाले होते.

या पार्किंगच्या जागेत वाळूच्या टेकड्या असून त्यांचे संरक्षण करण्याची गरज आजच्या ग्रामसभेत व्‍यक्‍त झाली, अशीही माहिती त्यांनी दिली. शेवटी ही जागा भाडेपट्टीवर देण्यास विरोध करणारा ठराव ग्रामसभेने संमत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT