Vijayadurga Idol In Zuari River: Dainik Gomantak
गोवा

Vijayadurga Idol In Zuari River: विजयादुर्गा देवीची प्राचीन मूर्ती सरकारच्या ताब्यात देण्यास भाविकांचा नकार

सांकवाळ येथे झुआरी नदीच्या पात्रामध्ये सापडली होती मूर्ती

दैनिक गोमन्तक डिजिटल

Vijayadurga Idol In Zuari River: सांकवाळ येथे झुआरी नदीच्या पात्रामध्ये सापडलेली श्री विजयादुर्गा देवीची प्राचीन मूर्ती सरकारच्या ताब्यात देण्यास भाविकांनी नकार दिला आहे. मूर्ती ताब्यात देण्यासंबंधीची नोटीस त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

सध्या ही मूर्ती सांकवाळ येथील डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या घरात विधीवत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याला त्या मूर्तीसंबंधी जी काही तपासणी करावयाची आहे, ती त्यांनी डॉ. वायंगणकर यांच्या निवासस्थानी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने ही मूर्ती २४ तासांमध्ये पुरातत्त्व खात्याकडे सोपवावी, अशा आशयाचे पत्र २४ मे रोजी दिले होते. त्यामुळे मूर्ती नेण्यास विरोध करण्यासाठी तेथे भाविक जमा झाले होते.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक सुभाष वेलिंगकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे राज्य अध्यक्ष नितीन फळदेसाई, भारत माती की जय संघाच्या धर्मजागरण प्रकोष्टाचे प्रतिनिधी राजेंद्र वेलिंगकर, करणी सेनेचे गोवा प्रमुख संतोषसिंह राजपूत व इतरांनी डॉ. वायंगणकर यांच्या निवासस्थानाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

यावेळी देवीच्या मूर्तीचे श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

उपजिल्हाधिकारी कार्यालयाची नोटीस म्हणजे, हिंदू धर्मभावना, आस्था यात केला गेलेला हस्तक्षेप आहे. त्यामुळे नोटीस त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुरातत्त्व खात्याने प्राचीन मंदिराच्या वारसास्थळ संरक्षित जागेत बाह्यशक्तींना हस्तक्षेप कसा करू दिला.

तेथील वारसा अवषेष मंदिराची प्राचीन तळी, विशाल वटवृक्ष कसे नष्ट केले गेले, याचे पुरावे उपलब्ध असल्याचे भाविकांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. वायंगणकर यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला उत्तर दिले आहे. त्यांनी पत्रामध्ये प्राचीन विजयादुर्गा मंदिरासंबंधी तसेच त्यानंतरच्या घडामोडीचा थोडक्यात आढावा घेतला आहे. मूर्तीची तपासणी आपल्या निवासस्थानी करावी.

मूर्ती नेण्यासंबंधी निर्देश देणे चुकीचे आहे, असे म्हटले आहे. जी मंदिरे पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केल होती. त्यासंबंधी माहिती गोवा सरकारने मागितली होती. त्यासंबंधी आपण यापूर्वीच अर्ज केला आहे. आता मूर्ती सापडल्याने आमच्या दाव्याला पुष्ठी मिळाली आहे, अस दावा पत्रात केला आहे.

सरकारने मूर्ती ताब्यात घेऊन ती कोपऱ्यात ठेवण्यापेक्षा तिची दुरुस्ती करून तिची स्थापना करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे. पोर्तुगीजांनी शांखवाळचे मंदिर पाडून चर्च बांधले नाही. त्यामुळे ती जागा हिंदूच्या ताब्यात देऊन तिचा धार्मिक स्थळ म्हणून विकास करावा.

धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT